लैंगिक छळाच्या प्रकरणी सर्व आऱोपांमधून निर्दोष मुक्त झाले तरुण तेजपाल, 2013चे आहे प्रकरण

तहलका या मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषणाच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त झाले आहेत. गोव्याच्या एका न्यायालयाने याप्रकरणी सर्व आरोपांमधून तेजपाल यांची मुक्तता केली आहे. हे 2013चे प्रकरण आहे.

Tarun Tejpal
लैंगिक छळाच्या प्रकरणी सर्व आऱोपांमधून निर्दोष मुक्त झाले तरुण तेजपाल, 2013चे आहे प्रकरण 

थोडं पण कामाचं

  • गोव्याच्या एका हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2013मध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप
  • पीडितेच्या आरोपांनंतर 30 नोव्हेंबर रोजी गोवा पोलिसांनी केली होती अटक
  • प्रचंड गाजले होते प्रकरण, त्यावेळी तहलकाचे संपादक होते तरुण तेजपाल

गोवा: तहलका (Tehelka) मासिकाचे (magazine) मुख्य संपादक (chief editor) तरुण तेजपाल (Tarun Tejpal) हे लैंगिक शोषणाच्या (sexual harassment) सर्व आरोपांमधून (allegations) निर्दोष मुक्त (acquitted) झाले आहेत. गोव्याच्या (Goa) एका न्यायालयाने (court) याप्रकरणी सर्व आरोपांमधून तेजपाल यांची मुक्तता (acquittal) केली आहे. त्यांच्या एका सहकाऱ्याने (colleague) त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात (sessions court) या प्रकरणाची सुनावणी (hearing) झाली. पीडितेचा आरोप आहे की 2013 साली गोव्याच्या एका हॉटेलमध्ये (hotel) तेजपाल यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. न्यायालयाने ज्यावेळी आपला निकाल (verdict) सुनावला तेव्हा तेपजाल तिथे उपस्थित होते.

27 एप्रिल रोजी लागणार होता निकाल

याप्रकरणाची सुनावणी न्यायालयाने पूर्ण केली होती आणि याचा निकाल 27 एप्रिल रोजी लावला जाणार होता, पण तारखा पडत राहिल्या. याप्रकरणी तेजपाल यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीमचे प्रमुख राजीव गोम्स यांचा गेल्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाला.

गुन्हे शाखेने केली होती तेजपाल यांना अटक

याप्रकरणी प्राथमिक तपास केल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तेजपाल यांना 2013 साली अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी दिलासा मिळवण्यासाठी तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजाही गाठला होता, पण त्यांची याचिका फेटाळण्यात आली. तेजपाल यांच्यावरचे हे आरोप त्यावेळी प्रचंड चर्चेत होते.

तेजपाल यांनी मानले न्यायालयाचे आभार

न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने आल्यानंतर तेजपाल यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि म्हटले, 'नोव्हेंबर 2013मध्ये माझ्या एका सहकाऱ्याने माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आज सत्र न्यायालयाने माझी मुक्तता केली. या वर्षांमध्ये अनेक वकिलांनी मला मदत केली, मी त्या सर्वांचा ऋणी आहे.' आपल्या पित्याकडून जारी केलेले पत्र वाचून दाखवताना त्यांच्या मुलीने म्हटले, 'गेल्या साडेसात वर्षांमध्ये आमचे कुटुंब खूप वाईट काळातून गेले आहे.'

लिफ्टमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप

2013 साली तेजपाल यांच्या महिला सहकाऱ्याने त्यांच्यावर हॉटेलच्या लिफ्टमध्ये तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. ही घटना गोव्याच्या बांबोलिम इथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली होती. तिथे तहलकाकडून पिंक नामक एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलेच्या आरोपांनंतर पोलिसांनी तेजपाल यांना 30 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यावेळी तेजपाल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी