पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची 'टीचर सेना'

Terrorists teacher army in Pakistan : दिल्ली पोलिसांनी जीशान कमर (२८) आणि ओसामा (२२) या दोन दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या दहशतवाद्यांविरोधात ५६ पानांचे आरोपपत्र दाखल केले.

Terrorists teacher army in Pakistan
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची 'टीचर सेना' 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची 'टीचर सेना'
  • दिल्ली पोलिसांनी जीशान कमर (२८) आणि ओसामा (२२) या दोन दहशतवाद्यांना अटक केली
  • अटक केलेल्या दहशतवाद्यांविरोधात ५६ पानांचे आरोपपत्र दाखल

Terrorists teacher army in Pakistan : दिल्ली पोलिसांनी जीशान कमर (२८) आणि ओसामा (२२) या दोन दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या दहशतवाद्यांविरोधात ५६ पानांचे आरोपपत्र दाखल केले. दहशतवाद्यांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांना पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. पाकिस्तानच्या लष्करात असलेली इस्लामाबादची मेजर हमजा नावाची व्यक्ती प्रशिक्षण देत होती, असे दहशतवाद्यांनी पोलिसांना सांगितले. 

विमान तांत्रिक कारणामुळे पाकिस्तानमध्ये दाखल झाले आणि पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला अटक केली. यानंतर पाकिस्तानच्या ज्या लष्करी अधिकाऱ्यांनी विंग कमांडर अभिनंदन अटकेत असल्याचे दाखविण्यासाठी त्याच्यासोबत फोटो काढून घेतला होता त्यात मेजर हमजा होता. जीशान कमर आणि ओसामा या दहशतवाद्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेले तसेच प्रसारमाध्यमांकडे असलेले विंग कमांडर अभिनंदन सोबतचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे काही फोटो दहशतवाद्यांना दाखवले. या फोटोंमधून दहशतवाद्यांनी मेजर हमजा याला ओळखले. मेजर हमजाच्या नेतृत्वातील टीमने तीन शिफ्टमध्ये सलग काही दिवस प्रशिक्षण दिले. ब्रेनवॉशसाठी काही व्हिडीओ दाखविले, असेही दहशतवादी म्हणाले.

पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी जीशान कमर आणि ओसामा या दोघांना सप्टेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी दिलेली कबुली आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी जीशान कमर आणि ओसामा या दोघांविरोधात ५६ पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी