पोलिसाने केला अंदाधुंद गोळीबार आणि चाकूहल्ला, 32 ठार

Thailand: At least 32 killed in attack on nursery : पोलिसाने अंदाधुंद गोळीबार केला तसेच काही जणांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात 32 जण ठार झाले. ही धक्कादायक घटना थायलंडमध्ये नोंग बुआ लाम्फू प्रांतात घडली. 

Thailand: At least 32 killed in attack on nursery
पोलिसाने केला अंदाधुंद गोळीबार आणि चाकूहल्ला, 32 ठार 
थोडं पण कामाचं
  • पोलिसाने केला अंदाधुंद गोळीबार आणि चाकूहल्ला, 32 ठार
  • धक्कादायक घटना थायलंडमध्ये नोंग बुआ लाम्फू प्रांतात घडली
  • मेक्सिकोत गोळीबार, 18 ठार

Thailand: At least 32 killed in attack on nursery : पोलिसाने अंदाधुंद गोळीबार केला तसेच काही जणांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात 32 जण ठार झाले. ही धक्कादायक घटना थायलंडमध्ये नोंग बुआ लाम्फू प्रांतात घडली. 

एका प्री स्कूल चाइल्ड डेकेअर सेंटरमध्ये पोलिसाने बेधुंद गोळीबार केला आणि काही जणांवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात ठार झालेल्या 32 जणांमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. हल्लेखोर पोलिसाच्या या धक्कादायक वर्तनाचे कारण समजलेले नाही. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पोलीस फरार झाला. ठिकठिकाणी नाकाबंदी करून हल्लेखोराला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्राथमिक वृत्तानुसार हल्लेखोर हा निलंबित पोलीस आहे. निलंबन झाल्यानंतर पोलिसाने हे धक्कादायक कृत्य केले. हल्लेखोराला अखेरच बघितले तेव्हा तो एक पांढऱ्या रंगाची, चार दरवाजांची टोयोटा पिक अप चालवत होता. या पिक अपचे रजिस्ट्रेशन बँकॉक येथे झाले होते.

Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

Bigg Boss Marathi Season 4: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

मेक्सिकोत गोळीबार, 18 ठार

थायलंडमध्ये घडलेल्या घटनेच्या काही तास आधी मेक्सिको देशातील गुरेरो राज्यातील सॅन मिगुएल टोटोलापनच्या सिटी हॉलमध्ये एका शस्त्रधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यात महापौरांसह 18 जण ठार झाले. गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाला. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार 5 जुलै 2022 रोजी दुपारी शस्त्रधारी व्यक्ती सिटी हॉलमध्ये दाखल झाली. या व्यक्तीने बेधुंद गोळीबार केला. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा तसेच सात पोलिसांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी