मेहबुबा मुफ्तींना भोवली 'ती' टिप्पणी

Three PDP leaders TS Bajwa, Ved Mahajan & Hussain A Waffa resign तिरंगा आणि रद्द झालेल्या कलम ३७० संदर्भात केलेली टिप्पणी मेहबुबा मुफ्ती यांना भोवली. पीडीपीच्या तीन नेत्यांनी मेहबुबांचा निषेध करत राजीनामा दिला.

Three PDP leaders TS Bajwa, Ved Mahajan & Hussain A Waffa resign from the party
मेहबुबा मुफ्तींना भोवली 'ती' टिप्पणी 

थोडं पण कामाचं

  • मेहबुबा मुफ्तींना भोवली 'ती' टिप्पणी
  • पीडीपीच्या तीन नेत्यांनी मेहबुबांचा निषेध करत दिला राजीनामा
  • कलम ३७० रद्द झाले आहे आणि ते पुन्हा लागू होणार नाही - केंद्र सरकार

नवी दिल्ली: तिरंगा (Tiranga / Tricolour / Tricolor) आणि रद्द झालेल्या कलम ३७० संदर्भात केलेली टिप्पणी मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना भोवली. त्यांनी वादग्रस्त टिप्पणी करुन २४ तास उलटण्याच्या आधीच पीडीपीच्या (Peoples Democratic Party - PDP) तीन नेत्यांनी राजीनामा दिला. मेहबुबा मुफ्ती यांच्या टिप्पणीचा निषेध म्हणून हे राजीनामे सादर झाले. पीडीपीच्या टीएस बाजवा (TS Bajwa), वेद महाजन (Ved Mahajan) आणि हुसेन ए वफ्फा (Hussain A Waffa) यांनी राजीनामा (resign) दिला. मेहबुबा मुफ्ती यांनी देशभक्तीची भावना दुखावणारी वक्तव्य केल्याचे सांगत राजीनामे सादर झाले. एकदम तीन नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरू आहे. (Three PDP leaders TS Bajwa, Ved Mahajan & Hussain A Waffa resign from the party)

मेहबुबा मुफ्ती यांनी श्रीनगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मेहबुबा मुफ्ती यांच्या टेबलवर जम्मू काश्मीरचा रद्द झालेला झेंडा आणि पीडीपीचा झेंडा होता. टेबलवर तिरंगा नव्हता. या संदर्भात प्रश्न विचारताच, 'मला निवडणूक लढवण्याची आणि तिरंगा हाती घेण्याची इच्छा नाही. ज्या दिवशी कलम ३७० पुन्हा लागू होईल त्याच दिवशी तिरंगा हाती घेईन', असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. दरोडेखोरांनी माझा झेंडा लुटला, असेही मेहबुबा म्हणाल्या. मेहबुबा यांच्या या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी पीडीपीच्या तीन नेत्यांनी राजीनामा दिला. 

भाजपने श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झळकावत मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तिरंगा झळकावणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. याआधी भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रविवारी जम्मूतील पीडीपी ऑफिस बाहेर घोषणाबाजी केली आणि तिरंगा झळकावला. नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थेट जम्मूतील पीडीपी ऑफिसवर तिरंगा झळकावला. 

केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad, Minister of Law and Justice of India) यांनी मेहबुबा मुफ्ती यांचे वक्तव्य म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याचे सांगितले. कलम ३७० रद्द झाले आहे आणि ते पुन्हा लागू होणार नाही, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. कलम ३७० रद्द करण्याची सर्व प्रक्रिया लोकशाही मार्गाने पार पडली असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. जम्मू काश्मीरसाठी कायदे करण्याचे अधिकार असलेल्या भारताच्या संसदेत (Parliament of India) बहुमताने कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आधी राज्यसभेत (Rajya Sabha) आणि नंतर लोकसभेत (Lok Sabha) ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही सभागृहांमध्ये कलम ३७० रद्द करण्यासाठीच्या प्रस्तावाला (Article 370 and 35(A) revoked) पाठिंबा मिळाला. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आणि केंद्रशासीत प्रदेश आहे, असेही ते म्हणाले. कलम ३७० रद्द करण्याचे वचन भारत (India / Bharat) सरकारने दिले होते आणि ते वचन पूर्ण केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे प्रचंड कौतुक होत आहे, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी