टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे निधन

लोकल ते ग्लोबल
Updated May 14, 2021 | 02:04 IST

टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.

थोडं पण कामाचं

  • टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे निधन
  • ८४ वर्षांच्या होत्या
  • देशातील सर्वात मोठ्या माध्यम समुहाच्या अध्यक्षा होत्या

नवी दिल्ली: टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भारताल्या टाइम्स समुहाला १८२ वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत समुहाचे अध्यक्षपद इंदू जैन भूषवित होत्या. त्या देशातील सर्वात मोठ्या माध्यम समुहाच्या अध्यक्षा होत्या. एवढी मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या इंदू जैन यांची अध्यात्माची ओढ होती. त्या कायम एका साधकाप्रमाणे राहिल्या. Times Group Chairperson Indu Jain passes away at 84

उत्तम कार्यासाठी दान करणे, कलेचे रक्षण करणे आणि महिला अधिकारांसाठी सजग असणे ही त्यांच्या जीवनाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये होती. इंदू जैन यांनी गुरुवारी १३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

इंदू जैन यांना कोरोना झाला होता आणि मागील काही दिवसांपासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांच्या तब्येतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही आणि त्यांनी गुरुवारी १३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. टाइम्स समूह त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. 

इंदू जैन यांनी टाइम्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या असंख्य नागरिकांना वेळोवेळी मदत दिली. टाइम्स रिलीफ फंडाच्या माध्यमातून त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे रस्त्यावर आलेल्या असंख्य नागरिकांना आधार दिला होता. 

टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. ही संस्था ज्ञानपीठ पुरस्कार देते. इंदू जैन यांना त्यांच्या कार्यासाठी २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. 

इंदू जैन यांचा विवाह अशोक जैन यांच्याशी झाला होता. अशोक जैन यांचे ४ फेब्रुवारी १९९९ रोजी क्लीवलँड युनायटेड स्टेट्स येथे निधन झाले. हा धक्का सहन करुन इंदू सार्वजनिक कार्यात सक्रीय राहिल्या. इंदू जैन यांनी वर्ल्ड पी सम्मीट २००० मध्ये संयुक्त राष्ट्र येथे एक भाषण केले होते. तसेच इंदू जैन फिक्कीच्या महिला विभागाच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. मानवतावादी दृष्टीकोन आणि देशभर अनेक चांगल्या कार्यांसाठी विविध स्वरुपात दिलेली मदत यसाठी इंदू जैन ओळखल्या जात होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे समीर जैन आणि विनीत जैन तसेच एक मुलगी आहे.  

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

टाइम्स समुहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच देशाच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी