TIMES NOW-C-Voter tracker poll: बिहार निवडणुकीपूर्वी जाणून घ्या मोदी सरकारबाबत मतदारांचा मूड

TIMES NOW-C-Voter tracker poll: बिहार निवडणुकीपूर्वी टाइम्स नाऊ ने सी वोटर सोबत मिळून नागरिकांचीा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया मोदी सरकारबाबत नागरिकांचा कौल काय आहे.

TIMES NOW-C-Voter tracker poll
TIMES NOW-C-Voter tracker poll  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकांना आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी (Bihar assembly election) टाइम्स नाऊ ने जनतेचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मतदार हे एनडीए सरकारवर (NDA government) किती समाधानी आहेत?, मोदी सरकारने (Modi Government) कोरोना साथीचा (Covid-19) कसा सामना केला? अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार काय करत आहे? तसेच मोदी सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या कार्याबाबत नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले. टाइम्स नाऊ आणि सी वोटर्सने हा सर्व्हे (Times Now-C-Voter Tracker Poll) केला आहे.

हा सर्व्हे करताना नागरिकांना विचारण्यात आले की, आपण एनडीए सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी आहात? यापैकी ३६.२७ टक्के नागरिकांनी खूप समाधानी असल्याचं सांगितलं. ३१.८६ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात समाधानी असल्याचं सांगितलं. तर ३१.५८ टक्के नागरिकांनी आपण असमाधानी असल्याचं सांगितलं आहे. 

एनडीए सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी ?

  1. खूप समाधानी - ३६.२७ टक्के
  2. काही प्रमाणात समाधानी - ३१.८६ टक्के 
  3. असमाधानी - ३१.५८ टक्के 

नागरिकांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर आपण किती समाधानी आहात? यावर ४३.८९ टक्के नागरिकांनी खूप समाधानी असल्याचं सांगितलं. ३१.१६ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात समाधानी असल्याचं म्हटलं तर २४.९५ टक्के नागरिकांनी असमाधानी असल्याचं सांगितलं.

पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर आपण किती समाधानी?

  1. खूप समाधानी - ४३.८९ टक्के
  2. काही प्रमाणात समाधानी - ३१.१६ टक्के 
  3. असमाधानी - २४.९५ टक्के 

राहुल गांधींपेक्षा पंतप्रधान मोदी आघाडीवर

मतदारांना प्रश्न विचारण्यात आला की, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून तुम्ही कोणाची निवड कराल अशी संधी तुम्हाला मिळाली तर? या प्रश्नावर उत्तर देत ६६.०७ टक्के नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. २३.७४ टक्के नागरिकांनी राहुल गांधींची निवड केली आणि ५.९३ टक्के नागरिकांनी दोघांचीही निवड केली. 

सर्व्हेक्षणात पुढील प्रश्न विचारण्यात आला की, राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात. या प्रश्नावर २५.४६ टक्के नागरिकांनी आपण खूप समाधानी असल्याचं सांगितलं. ३४.२९ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात समाधानी असल्याचं म्हटलं तर ४०.२४ टक्के नागरिकांनी असमाधानी असल्याचं सांगितलं.

सर्वात मोठा मुद्दा आणि प्रश्न कोणता?

सर्व्हेक्षणात नागरिकांना विचारण्यात आले की, तुमच्या समोर सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? यावर ५१.१६ टक्के नागरिकांनी बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं. कोरोना सारख्या महामारीला १२.६१ टक्के नागरिकांनी मोठा मुद्दा म्हटलं तर ७.४३ टक्के नागरिकांनी भ्रष्टाचार सर्वात मोठा मुद्दा असल्याचं सांगितलं.

सर्व्हेक्षणात विचारण्यात आले की, तुम्ही सर्वात नाराज कोणावर आहात? यावर २४.१ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलं. १२.२७ टक्के नागरिकांनी केंद्र सरकारचं नाव घेतलं. १०.१९ टक्के नागरिकांनी स्थानिक आमदार बदलावा असं म्हटलं. तर ५३.४४ टक्के नागरिकांनी इतर गोष्टी सांगितल्या. 

बिहार राज्य सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी?

  1. खूप समाधानी - १९.०१ टक्के 
  2. काही प्रमाणात समाधानी - ४३.३२ टक्के 
  3. असमाधानी - ३७.६७ टक्के 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी