प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल 'टाइम्स नाउ नवभारत'

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 01, 2021 | 14:21 IST

'टाइम्स नाउ नवभारत' हा नागरिक आणि सरकार यांच्यातील संवादाचे सशक्त माध्यम होईल, असे 'टाइम्स नेटवर्क'चे एमडी आणि सीईओ एमके आनंद म्हणाले.

थोडं पण कामाचं

  • प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल 'टाइम्स नाउ नवभारत'
  • नागरिक आणि सरकार यांच्यातील संवादाचे सशक्त माध्यम
  • 'अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत'

नवी दिल्ली: 'अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत' ही टॅगलाइन घेऊन भारतीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आला आहे 'टाइम्स नेटवर्क'चा हिंदी न्यूज चॅनल 'टाइम्स नाउ नवभारत'. आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत अध्यक्ष झाला. याच महिन्यात रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महत्त्वाच्या महिन्यात लाँच झालेला 'टाइम्स नाउ नवभारत' बातम्यांच्या सादरीकरणाचे स्वरुप बदलणार आहे. परंपरागत पद्धत मोडीत काढून 'टाइम्स नाउ नवभारत' थेट जनतेशी संवाद साधणार आहे. नागरिकांच्या विचारांना चालना देणार आहे आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देणार आहे. थेट जनतेशी संबंधित मुद्यांची बातमीदारी करण्याला 'टाइम्स नाउ नवभारत' प्राधान्य देणार आहे. Times Now Navbharat an initiative to convey people’s correct message to Govt: Times Networks MK Anand

'टाइम्स ग्रुप'चा 'टाइम्स नाउ नवभारत' हा हिंदी न्यूज चॅनल दर्जेदार ऑडिओ व्हिज्युअलसह आज (रविवार १ ऑगस्ट २०२१) सकाळी लाँच झाला. चॅनलचे प्रक्षेपण सुरू आहे. लोकभिमुख बातम्या, सोपे सुटसुटीत सादरीकरण हे या चॅनेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. समाजाची ताकद बनून हा चॅनल पुढे येत आहे. 'टाइम्स ग्रुप'ने सोळा वर्षांपूर्वी 'टाइम्स नाउ' हा इंग्रजी न्यूज चॅनल लाँच केला. आजही हा चॅनल प्रचंड लोकप्रिय आहे. याच पद्धतीने 'टाइम्स नाउ नवभारत' या हिंदी न्यूज चॅनललाही प्रेक्षकांची पसंती लाभेल, असा विश्वास 'टाइम्स नेटवर्क'चे एमडी आणि सीईओ एमके आनंद (MK Anand) यांनी व्यक्त केला. 'टाइम्स नाउ नवभारत' हा नागरिक आणि सरकार यांच्यातील संवादाचे सशक्त माध्यम होईल, असेही 'टाइम्स नेटवर्क'चे एमडी आणि सीईओ एमके आनंद म्हणाले.

हिंदी ही भारतात संवादासाठी, माहितीसाठी मोठ्या प्रमाणावर आणि सहजतेने वापरली जाणारी भाषा आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्येही हिंदी भाषेचा समावेश होतो. याच कारणामुळे 'टाइम्स नेटवर्क' हिंदी न्यूज चॅनल घेऊन येत आहे. 'अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत' (Ab Badlega Bharat, Banega Navbharat) या विचाराने हा चॅनल लाँच होत आहे. भारतातील सर्व प्रमुख केबल ऑपरेटर, मल्टीसिस्टम ऑपरेटर आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर हा चॅनल बघता येईल. 

लोकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी 'टाइम्स नाउ नवभारत' हा हिंदी न्यूज चॅनल जबरदस्त जाहिरात मोहीम राबवत आहे. हिंदी भाषेत लवकरच हा चॅनल कमालीचा लोकप्रिय होईल, असा विश्वास 'टाइम्स नेटवर्क'चे एमडी आणि सीईओ एमके आनंद (MK Anand) यांनी व्यक्त केला. 

'टाइम्स नाउ नवभारत'वर संध्याकाळी पाच वाजता सुशांत सिन्हा सोबत राष्ट्रवाद हा डिबेट शो, संध्याकाळी सहा वाजता अंकित त्यागीसह लोग तंत्र हा न्यूज शो, संध्याकाळी सात वाजता पद्मजा जोशीसह धाकड़ एक्सक्लूसिव हा न्यूज शो, रात्री आठ वाजता एडिटर इन चीफ नविका कुमार यांच्यासह सवाल पब्लिक का हा डिबेट शो, रात्री नऊ वाजता सुशांत सिन्हासह न्यूज की पाठशाला हा न्यूज अॅनॅलिसिस शो, रात्री दहा वाजता मीनाक्षी कंडवालसह ओपिनियन इंडिया का हा न्यूज शो बघता येईल. 

वृत्तपत्रांच्या क्षेत्रात 'टाइम्स ऑफ इंडिया', 'इकॉनॉमिक टाइम्स', 'नवभरात टाइम्स', वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात 'टाइम्स नाउ' अशा दिग्गज ब्रँडसह अनेक ब्रँड मोठे करणारा 'टाइम्स ग्रुप' हिंदी न्यूज चॅनलच्या क्षेत्रात धमाका करण्यासाठी 'टाइम्स नाउ नवभारत' घेऊन आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी