Times Now Navbharat Exclusive मसूद अझरचा पाकिस्तानमधील तळ

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 01, 2021 | 12:37 IST

मसूद अझरच्या पाकिस्तानमधील तळाची माहिती 'टाइम्स ग्रुप'च्या 'टाइम्स नाउ नवभारत' या हिंदी न्यूज चॅनलच्या हाती आली आहे.

थोडं पण कामाचं

  • मसूद अझरच्या पाकिस्तानमधील तळाची माहिती
  • पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये आहे मसूद अझर
  • मसूद अझर हा पाकिस्तान पुरस्कृत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलेल्या आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अझरच्या पाकिस्तानमधील तळाची माहिती 'टाइम्स ग्रुप'च्या 'टाइम्स नाउ नवभारत' या हिंदी न्यूज चॅनलच्या (Times Now Navbharat) हाती आली आहे. Times Now Navbharat Exclusive and big expose on Jaish-e-Mohammed chief Masood Azhar

'टाइम्स नाउ नवभारत'च्या (Times Now Navbharat) टीमने दहशतवादी मौलाना मसूद अझरच्या 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानमधील मुख्य तळ शोधला आहे. पाकिस्तानने मसूद अझरला जगापासून लपवून सुरक्षित ठेवले आहे. मसूद अझर त्याच्या तळावरुन 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी कारवायांचे सूत्रसंचालन करत आहे. ही ब्रेकिंग न्यूज 'टाइम्स नाउ नवभारत' आपल्याला देत आहे.

दहशतवादी मौलाना मसूद अझर पाकिस्तानमधील बहावलपूर येथे आहे. हेच बहावलपूर मसूद अझरचे जन्मस्थळ आहे. 'टाइम्स नाउ नवभारत'च्या हाती मसूद अझरच्या तीन ठिकाणांचे फोटो आले आहेत. यापैकी पहिला आहे उस्मान-ओ-अली मशिद. हे ठिकाण मसूद अझरच्या घराजवळ आहे. मशिद आणि मसूद अझरचे घर याच्या जवळ नॅशनल ऑर्थोपेडिक अँड जनरल हॉस्पिटल आहे. घराजवळच रॉयल पॅलेस मॅरेज हॉल आहे. सब्जाजार मॅरेज लॉन आणि बंधन मॅरेज लॉन पण मसूद अझरच्या घराजवळ आहे. 

अमेरिकेने लादेन विरोधात कारवाईसाठी एबटाबाद येथील एका घरावर कमांडो कारवाई केली होती. पण या पद्धतीची कारवाई मसूद अझर विरोधात करणे कठीण आहे. लादेन जिथे राहात होता ते घर इतर घरांपासून दूर होते. या ठिकाणाला लक्ष्य करुन कमांडो कारवाई करणे शक्य होते. पण मसूद अझरच्या घराभोवती मोठी निवासी वस्ती आहे. अनेक अरुंद गल्ल्या आहेत. यामुळे कमांडो कारवाईचा अंदाज आल्यास मसूद अझर आणि त्याचे सहकारी निवासी वस्तीमधून पळून जाण्याची किंवा आयत्यावेळी अन्यत्र लपण्याची शक्यता आहे.

मसूद अझरच्या घराभोवती पाकिस्तानच्या लष्कराच्या जवानांचा बंदोबस्त आहे. 'टाइम्स नाउ नवभारत'च्या (Times Now Navbharat) हाती या व्यवस्थेचे फोटो आले आहेत. 'टाइम्स नाउ नवभारत'च्या (Times Now Navbharat) हाती एक टेप आली आहे. यात दहशतवादी मसूद अझरचा आवाज आहे. मसूद अझर नागरिकांना धर्माच्या नावाखाली हिंसा काश्मीरमध्ये हिंसा करण्यासाठी चिथावणी देत आहे. 

कोण आहे मसूद अझर?

मसूद अझर हा पाकिस्तान पुरस्कृत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. भारताविरोधातल्या अनेक दहशतवादी कारवायांसाठी हा वाँटेड आहे. भारताच्या सुरक्षा पथकांनी मसूद अझरला अटक करुन जेलमध्ये टाकले होते. पण नेपाळची राजधानी काठमांडू येथून उड्डाण केलेल्या इंडियन एअरलाइन्स कंपनीच्या आयसी ८१४ या विमानाचे १९९९ मध्ये अपहरण झाले. पाच दहशतवाद्यांनी नेपाळमध्येच विमानात प्रवेश केला होता. या दहशतवाद्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून विमान अफगाणिस्तानमध्ये नेऊन उतरवले. प्रवाशांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी मसूद अझरच्या सुटकेची मागणी केली. यामुळे जेलबाहेर आलेला मसूद अझर नंतर पाकिस्तानमध्ये गेला. तिथून तो भारताविरोधात दहशतवादी कारवाया करू लागला. 

भारताच्या संसदेवर २००१ मध्ये झालेला हल्ला, मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला दहशतवादी हल्ला, पठाणकोट एअरबेस येथे २०१६ मध्ये झालेला हल्ला, पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर २०१९ मध्ये झालेला हल्ला या सर्व कारवाया मसूद अझरच्या 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने केल्या. पण जुलै २०२१च्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या सुरक्षा पथकाने कमाल केली. मसूद अझरचा नातलग असलेल्या एका दहशतवाद्याला पुलवामात ठार करण्यात आले. इस्माल अल्वी ठार झाला.

मसूद अझर विषयी आणखी सविस्तर जाणून घेण्यासाठी बघा 'टाइम्स ग्रुप'चा हिंदी न्यूज चॅनल 'टाइम्स नाउ नवभारत'.....

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी