Times Now Summit 2021 : पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट करणार, मे २०२२ मध्ये 5G चा लिलाव होणार - अश्विनी वैष्णव

Times Now Summit 2021 : Railways Minister Ashwini Vaishnav says world class rail service soon पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट होईल, असे रेल्वेमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव एप्रिल-मे २०२२ मध्ये होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. 

Times Now Summit 2021 : Railways Minister Ashwini Vaishnav says world class rail service soon
पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट करणार, मे २०२२ मध्ये 5G चा लिलाव होणार - अश्विनी वैष्णव 
थोडं पण कामाचं
  • पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट करणार, मे २०२२ मध्ये 5G चा लिलाव होणार - अश्विनी वैष्णव
  • रेल्वेच्या सुविधांचा दर्जा सुधारला, रेल्वेच्या कारभारात सुधारणा
  • मर्यादीत प्रमाणात खासगी गुंतवणूकदारांना सोबत घेऊन हायब्रिड मॉडेल राबवण्याचे प्रयत्न सुरू

Times Now Summit 2021 : Railways Minister Ashwini Vaishnav says world class rail service soon । नवी दिल्ली: भारताचे रेल्वेमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी टाइम्स नाउ समिट 2021 च्या निमित्ताने टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी बातचीत केली. याप्रसंगी बोलताना पाच वर्षांत रेल्वेचा कायापालट होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. भारतात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव एप्रिल-मे २०२२ मध्ये होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. 

मागील सात वर्षांमध्ये रेल्वेच्या कारभारात सुधारणा दिसली आहे. रेल्वेच्या सुविधांचा दर्जा सुधारला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे नवनवे आरामदायी डबे (कोच) विकसित करत आहे. सार्वजनिक आणि खासगी गुंतवणूक अशा सहकार्यातून रेल्वेचा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित दिशा दाखवली आहे. रेल्वे मंत्रालय त्या दिशेने काम करत आहे. रेल्वे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळावी या दोन प्रमुख उद्दिष्टांना साध्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये वाढ होत आहे. गतीशक्ती योजनेचा रेल्वेला लाभ झाला आहे; असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

मर्यादीत प्रमाणात खासगी गुंतवणूकदारांना सोबत घेऊन हायब्रिड मॉडेल राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालवाहतुकीचे प्रमाण वाढवून त्या माध्यमातून जास्तीत जास्त महसूल संकलित करण्यासाठी काम सुरू आहे. पुढील पाच-सहा वर्षांमध्ये रेल्वे नफ्यात येत असल्याची जाणीव नागरिकांना होईल; असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

भारतीय रेल्वेतून होणारा लांबचा प्रवास हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक सुखद अनुभव असावा यासाठी विविध योजनांवर काम सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

रामायण ट्रेन या गाडीच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संस्कृती, तिच्यातील वैविध्य आणि महत्त्व सांगण्याचा प्रयत्न आहे. लवकरच रेल्वे गुरुकृपा आणि सफारी ट्रेन सुरू करणार आहे; अशीही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

पेगाससच्या मुद्यावरही अश्विनी वैष्णव बोलले. भारत सरकारने कायद्याच्या चौकटीत राहणे, कायद्याचे पालन करणे याला कायम प्राधान्य दिले आहे. सध्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या बाबतीत न्यायालय त्यांचे काम करेल. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीला भारत सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी