Times now Summit 2021 उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या मुद्यावर मतदान होईल - स्मृती इराणी

Times Now Summit 2021: Smriti Irani says, 'there will be charisma in the UP elections on the basis of development' टाइम्स नाउ समिटी २०२१ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी  टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी बातचीत केली.

Times Now Summit 2021: Smriti Irani says, 'there will be charisma in the UP elections on the basis of development'
Times now Summit 2021 उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या मुद्यावर मतदान होईल - स्मृती इराणी 
थोडं पण कामाचं
  • Times now Summit 2021 उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या मुद्यावर मतदान होईल - स्मृती इराणी
  • जे जमिनीवर पाय रोवून दीर्घकाळ काम करत आहेत, ते हवा बदलण्याची वाट बघत बसत नाही
  • नागरिकांच्या मनात घर करणारे वाऱ्याशी संघर्ष करतात, स्वतःला अनुकूल वातावरण निर्माण करतात

Times Now Summit 2021: Smriti Irani says, 'there will be charisma in the UP elections on the basis of development' । नवी दिल्ली: टाइम्स नाउ समिटी २०२१ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी  टाइम्स नेटवर्कच्या ग्रुप एडिटर आणि टाइम्स नाउ नवभारतच्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी बातचीत केली. याप्रसंगी स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक, ध्रुवीकरण, सलमान खुर्शीद यांचे नवे पुस्तक यांसह अनेक मुद्यांवर बेधडकपणे त्यांची मते मांडली. उत्तर प्रदेशमध्ये विकासाच्या मुद्यावर मतदान होईल; असे स्मृती इराणी म्हणाल्या. 

भारतात स्वच्छता हा राष्ट्रीय मुद्दा होऊ शकतो, असे याआधी कधी वाटले नव्हते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्त्व ओळखले. त्यांनी देशातील प्रत्येक घरात टॉयलेटची व्यवस्था हवी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली; असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लडकी हू, लडना जानती हू असे वक्तव्य केले होते तसेच महिला उमेदवारांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. या दोन मुद्यांवर उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदार संघातून राहुल गांधी यांचा पराभव करुन विजयी झालेल्या स्मृती इराणी यांना नाविका कुमार यांनी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची स्मृती इराणी यांनी अतिशय स्पष्ट उत्तरे दिली. 

'लडकी हू...' या वक्तव्याचा खरा अर्थ 'लडका है पर लड नहीं सकता' असा असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. महिला उमेदवारांसाठी ३० टक्के राखीव जागा याचा दुसरा अर्थ उरलेल्या ७० टक्के जागांवर महिलांना संधीच द्यायची नाही हा असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. राजकारणात प्रत्येकाला नशीब आजमावण्याचे स्वातंत्र्य आहे. पण आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात आणि नागरिकांच्या मनात आपल्याविषयी विश्वासाची भावना किती तीव्र आहे हे महत्त्वाचे आहे; असे वक्तव्य स्मृती इराणी यांनी केले. 

राजकारणात हवा कधीही बदलू शकते या प्रश्नाला लगेच स्मृती इराणी यांनी उत्तर दिले. हवा त्यांच्यासाठी बदलते जे काचेच्या घरात आहेत. जे जमिनीवर पाय रोवून दीर्घकाळ काम करत आहेत, ते हवा बदलण्याची वाट बघत बसत नाही. नागरिकांच्या मनात घर करणारे वाऱ्याशी संघर्ष करतात. स्वतःला अनुकूल वातावरण निर्माण करतात. जर तसे नसते तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळवणे जमले नसते. देशाला मोदी पंतप्रधान म्हणून लाभले नसते; असे स्मृती इराणी म्हणाल्या. 

सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या एका पुस्तकात हिंदुत्वाविषयी लिहिलेल्या वाक्यांवरुन वाद सुरू आहे. याच खुर्शीद यांनी काही वर्षांपूर्वी ८४च्या दंगलीचा उल्लेख करुन हिंदू आणि शीख यांना फाळणीच्या पापाची शिक्षा मिळाली अशा स्वरुपाचे वाक्य लिहिले होते; याची स्मृती इराणींनी आठवण करुन दिली. 

ध्रुवीकरणाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नांना स्मृती इराणी यांनी स्पष्ट उत्तरं दिली. नागरिकांना कोण काय करत आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे समजत आहे. आता लोकांची फसवणूक करणे कठीण आहे. कोणी तरी सरदार पटेल आणि बॅ. जिन्ना यांची तुलना केली. पण ही तुलना अशक्य आहे. कारण सरदार पटेल यांनी संस्थान विलीनीकरण प्रक्रिया राबवून देशाच्या एकात्मतेला प्राधान्य दिले. या उलट जिन्ना यांनी देश तोडण्याचे काम केले. हा फरक नीट समजून घेण्यासाठी केवडिया येथे सरदार पटेल यांच्या स्मारकाला भेट देणे आवश्यक असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी