यावेळी सर्वात मोठा हिंदू कोण आहे याची लढाई, मुस्लिम कधीही व्होट बँक नव्हता : असदुद्दीन ओवैसी

Times Now Summit 2021  मध्ये, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशाच्या राजकारणातील अनेक पैलूंवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि आपला लढा जातीयवादाच्या विरोधात आणि समान हक्कांसाठी असल्याचेही सांगितले.

times now summit 2021 want equal share of muslims in indias political and educations system says asaduddin owaisi
यावेळी सर्वात मोठा हिंदू कोण आहे याची लढाई : ओवैसी 
थोडं पण कामाचं
  • AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी टाइम्स नाऊ समिटमध्ये 
  • यावेळी राजकारणात स्वत:ला सर्वात मोठा हिंदू सिद्ध करण्याची लढाई 
  • मुस्लिम ही कधीही व्होट बँक राहिलेली नाही, त्यांची फसवणूक झाली आहे.

Times Now Summit 2021: टाइम्स नाऊ समिट 2021 च्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी भारतातील राजकीय ध्रुवीकरण, तुष्टीकरण याबद्दल आपले मत व्यक्त केले. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (yogi Adityanath)यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, भारत हा एक देश आहे जिथे विविध धर्माचे लोक राहतात आणि आजकाल भारतीय राजकारणात हिंदुत्वाची जी संकल्पना रुजवली जात आहे ती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. (times now summit 2021 want equal share of muslims in indias political and educations system says asaduddin owaisi)

भारतीय राजकारणाच्या भवितव्यावर चर्चेदरम्यान, एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, सध्या देशात सर्वात मोठा हिंदू कोण यावर राजकीय लढाई सुरू झाली आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वात मोठे हिंदू नेते बनवण्याची भाजपची मोहीम आहे. ओवैसी यांनी स्वतःला मुस्लिमांचा नेता म्हणवून घेण्याचे नाकारले आणि ते म्हणाले की ते प्रत्येक जातीचे नेते आहेत आणि त्यांचा लढा कोणत्याही धर्म किंवा विचारसरणीसाठी सर्वोच्च नसून समान हक्कांसाठी आहे.

'समान हक्कासाठी माझा लढा'

टाइम्स नाऊच्या अँकर आणि सल्लागार पद्मजा जोशी यांच्याशी झालेल्या संभाषणात ओवैसी म्हणाले, “माझ्या राष्ट्रवादाचा प्रश्न आहे, माझा कोणताही धर्म किंवा विचारधारा उंचावण्याचा हेतू नाही. माझा लढा जातीयवादाच्या विरोधात आणि समान हक्कांसाठी आहे. मला भारताच्या राजकीय आणि शैक्षणिक व्यवस्थेत मुस्लिमांचा समान सहभाग हवा आहे. ते म्हणाले, भारत हा धार्मिक विविधतेचा देश आहे. कोणत्याही धर्माला न मानणारे लोक इथे आहेत. अशा स्थितीत हिंदुत्वाची विचारधारा भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे.

ते म्हणाले की, देशात कुठेही मुस्लिम व्होट बँक नव्हती, पण ती नेहमीच हिंदू व्होट बँक राहिली आहे आणि 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या परिस्थितीने हे पुन्हा सिद्ध केले आहे. यादरम्यान एआयएमआयएम प्रमुखांनी उपहासात्मक स्वरात म्हटले की जर मुस्लिम व्होट बँक असेल तर ते तुरुंगात आहेत. मुस्लिम व्होट बँकेच्या नावाखाली या समाजाची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी