Triple Murder: मुलगी, आईसह महिला पोलिसाचा मृतदेह आढळला; पोलीस लाईनमध्ये ट्रिपल मर्डरने एकच खळबळ

Lady constable and her mother, daughter found dead: महिला पोलीस कर्मचारी आणि तिची मुलगी, आई हे राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. पोलीस लाईनमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

triple murder case lady constable her daughter and mother found dead in policeline quarters in jamshedpur jharkhand
पोलीस लाईनमध्ये ट्रिपल मर्डरने खळबळ; मुलगी, आईसह महिला कॉन्स्टेबलची हत्या 
थोडं पण कामाचं
  • पोलीस लाईनमध्ये तिहेरी हत्याकांड
  • मुलगी, आईसह महिला कॉन्स्टेबलचा राहत्या घरात आढळला मृतदेह
  • तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

Triple murder in Jharkhand: झारखंडमधील जमशेदपूर येथील पोलीस लाईनमध्ये ट्रिपल मर्डर (Triple murder in Policeline) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस लाईनमधील एका घरात महिला पोलीस कॉन्स्टेबलसह त्यांची आई आणि मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (triple murder case lady constable her daughter and mother found dead in police line quarters in jamshedpur jharkhand)

या तिघांची हत्या कोणी आणि का केली याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाहीये. बहुतांश पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हे पोलीस लाईनमध्येच वास्तव्यास असतात. पण पोलीस लाईनमध्येच अशा प्रकारे तिहेरी हत्याकांड घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, घरात तिघांचे मृतदेह आढळले असून त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करण्यात आला होता. महिला पोलीस कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून कुणालाही दिसून आली नव्हती अशीही माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा: Suhas Kande: शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड खळबळजनक आरोप

या हत्याकांडानंतर घटनास्थळी डॉग क्वॉडसह पोलीस टीम दाखल झाली असून फॉरेन्सिक विभागाची टीमही घटनास्थळावरुन सॅम्पल्स गोळा करत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही सर्व अँगलने तपास करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या ही हत्याच असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या असून तपास सुरू करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी