त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Tripura Chief Minister Biplab Kumar Deb resigns, election of new leader soon : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.

Tripura Chief Minister Biplab Kumar Deb resigns, election of new leader soon
त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
  • नव्या CMची निवड भाजपच्या आमदारांच्या बैठकीत होणार
  • आज रात्री ८ वाजता बैठक

Tripura Chief Minister Biplab Kumar Deb resigns, election of new leader soon : आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिप्लब कुमार देव यांच्यात बातचीत झाली. यानंतर २४ तासांच्या आत बिप्लब कुमार देव यांनी राजीनामा सादर केला. त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीला पक्षाकडून पर्यवेक्षक म्हणून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. आज रात्री आठ वाजता बैठक होईल आणि या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार असल्याचे वृत्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी