[VIDEO] टोल प्लाझावर ट्रकवरील ताबा सुटला, बाइकसह दोघांना चिरडले

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 02, 2019 | 20:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

टोल प्लाझावर नियंत्रण सुटलेला ट्रकने दोन लोकांना चिरडल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली. घटनास्थळाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 

truck ramms toll plaza killed two including a bike rider one injured watch video cctv video news in marathi google newsstand
[VIDEO] टोल प्लाझावर ट्रकवरील ताबा सुटला, बाइकसह दोघांना चिरडले  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  तामिळनाडूचे कृष्णागिरी भागात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने दहशतीचे वातावरण निर्माण करून खूप मोठे नुकसान केले. कृष्णागिरी टोल प्लाझावर झालेल्या अपघाताचा एक खतरनाक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहिले जात आहे की, नियंत्रण सुटलेला एक ट्रक वेगाने पुढे जात आहे. त्या ठिकाणी त्याने टोल प्लाझावरील दोघांना चिरडले. 

ट्रकने हा हैदास इथे थांबला नाही त्याने दोघांचे प्राण घेतले. ही घटना रविवारी घडली आहे. बेदरकार या ट्रकने एका पायी चालणाऱ्या व्यक्ती आणि मोटार सायकलस्वाराला चिरडले. 

टोल प्लाझावरून पुढे जात मोटारसायकल स्वाराला धडक मारली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. मृतकांची ओळख पटली आहे. यात ६१ वर्षीय सेनाप्पन आणि ५१ वर्षाय प्रमिला यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती, रविवारला साडे तीन वाजता हा अपघात घडला. होसूर येथून एक ट्रक टोल प्लाझावर भरधाव वेगाने आला. त्याने लेन क्रॉस केल्यानंतर आपली मोटारबाईकवरून ऑफस जाणाऱ्या सेनाप्पन यांना ट्रक खाली चिरडले. त्यानंतर दूर उभ्या असलेल्या प्रमिला यांनाही ट्रकने चिरडले. 

टोल बूथवर स्टाफ पी. कविता या अपघात गंभीर दुखापत झाली. त्यांना कृष्णागिरी सरकारी हॉस्पिलटलमध्ये भरती करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी