Twin Towers नंतर आता 'या' ग्रुपच्या इमारतींवर पडणार हातोडा?

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 30, 2022 | 23:31 IST

नोएडामधील ट्विन टॉवर्स कोर्टाच्या निर्णयानंतर जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता आणखी एका ग्रुपवर सर्वांच्या नजरा आहेत. 

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील नोएडा येथील 93ए येथे सुपरटेक निर्मित ट्विन टॉवर्स रविवारी (28 ऑगस्ट) जमीनदोस्त करण्यात आले. अवैध बांधकाम करण्यात आल्याने टॉवर्सवर कारवाई करण्यात आली. जवळपास 100 मीटर उंच असे दोन्ही टॉवर्स अवग्या काही सेकंदातच जमीनदोस्त करण्यात आले. हे टॉवर्स पाडण्यासाठी 3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. टॉवर्समध्ये 9600 छिद्रे करण्यात आली आणि त्यानंतर तेथे स्फोटके भरण्यात आली. मग ही टॉवर्स जमीनदोस्त केली.

नोएडातील ट्विन टॉवर्स पाडण्यात आल्यावर आता सर्वांच्या नजरा आम्रपाली ग्रुपवर आहेत. सुप्रीम कोर्टाने ईडीकडे आम्रपाली ग्रुप विरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा स्टेटस रिपोर्ट मागवला आहे. त्यामुळे या ग्रुपच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी