Noida Twin Towers Demolition: ट्विन टॉवरच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये ट्विन टॉवर कोसळण्याची भीती स्पष्टपणे दिसत होती. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास एक बटण दाबल्यावर ट्विन टॉवर्स पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात जमीनदोस्त झाला. नोएडामधील सेक्टर 93 मधील भ्रष्टाचाराच्या पाठीवर उभा असलेला हा ट्विन टॉवर दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर पाडण्यात आला. पण हा टॉवर पाडण्याआधी याच्या आसपास राहणारे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं घाबरले आहेत. (twin towers demolition people living nearby are in awe while some become picnic spots for nodia sector 93A)
पिकनिक स्पॉट
एकीकडे आजूबाजूच्या सोसायटीत राहणारे लोक भीतीच्या छायेत होते तर काही लोकांसाठी तो पिकनिक स्पॉट झाला होता. पहाटे चार वाजल्यापासून लोक येथे पोहोचून सेल्फी घेत होते. ट्विन टॉवरच्या आजूबाजूला प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे काही जणांसाठी हा एक पिकनिक स्पॉट बनला होता.