उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला आग

Ujjain: Massive fire broke out in Mahakaleshwar temple : मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिराला गुरुवारी रात्री आग लागली. आग वेळेत विझविण्यात आली. यामुळे मोठे संकट टळले. 

Ujjain: Massive fire broke out in Mahakaleshwar temple
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला आग
  • आग वेळेत विझविण्यात आली
  • मोठे संकट टळले

Ujjain: Massive fire broke out in Mahakaleshwar temple : मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिराला गुरुवारी रात्री आग लागली. आग वेळेत विझविण्यात आली. यामुळे मोठे संकट टळले. 

Fraud marriage : लग्नाचं अमिष दाखवून सहा तरुणींना गंडा, सातवीनं घडवली अद्दल

आग लागली त्यामुळे भाविकांमध्ये थोडा वेळ घबराट पसरली. पण आग विझवण्यात यश आले आणि थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. मंदिरातील सर्व भाविक सुरक्षित आहेत. 

पोलीस लाईनमध्ये ट्रिपल मर्डरने एकच खळबळ

यंदा २ ऑगस्ट २०२२ रोजी नागपंचमी आहे. यासाठीची तयारी मंदिर परिसरात सुरू आहे. याच तयारीचा भाग म्हणून नागचंद्रेश्वर मंदिर या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागली. आग लवकर नियंत्रणात आणण्यात आली. 

Black Alien : नखापासून बुब्बुळापर्यंत टॅटूच टॅटू, अवतार पाहून कुणीच देईना नोकरी, प्रयोगशील कलाकाराची कैफियत

नागचंद्रेश्वर मंदिर येथे दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर परिसरात तयारी सुरू असताना आग लागली. पण आगीवर नियंत्रण मिळविणे थोड्याच वेळात शक्य झाले आणि संकट टळले. 

नागचंद्रेश्वर मंदिर येथे एक फोल्डिंग ब्रिज तयार करण्याचे काम सुरू होते. ब्रिजच्या कामासाठी वेल्डिंग सुरू असताना ठिणगी उडून आग लागली होती. या घटनेचा व्हिडीओ आला आहे. व्हिडीओतून घटनेचा अंदाज येतो. सुदैवाने आग लवकर विझवणे शक्य झाले आणि मोठे संकट टळल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी