कोलंबो : श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकट आणखीनच गडद झाले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. जनतेने महागाई विरोधात आवाज उठवला आहे. तेथील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.
यामुळे श्रीलंकन पोलीस आणि जनता आमनेसामने आली आहे. संतप्त आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले. राष्ट्रपती भवनाबाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. तसेच बळाचा देखील वापर केला जात आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस अश्रूधुराचा वापर करत आहेत. या गदारोळ आणि निदर्शनांदरम्यान राष्ट्राध्यक्ष राजपक्षे तेथून पळून गेले आहेत.
हे आहे श्रीलंकन जनतेच्या रागाचं खरं कारण..
दूध- 450 रुपये/लिटर
ब्रेड - रु.250/500 ग्रॅम
तांदूळ - रु.280/किलो
अंडी - रु.280/ एक नग
बटाटा - रु.290/किलो
कांदा - रु. 250/किलो
सफरचंद - रु. 900/किलो
संत्री - रु.714/किलो