मसूद विरोधातील कारवाईसाठी भारत आणणार आंतरराष्ट्रीय दबाव

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 01, 2021 | 14:53 IST

'टाइम्स नाउ नवभारत'ने दहशतवादी मसूद अझर याच्या पाकिस्तानमधील तळाची सविस्तर माहिती दिली. या वृत्तांकनाची भारत सरकारने दखल घेतली.

थोडं पण कामाचं

  • मसूद विरोधातील कारवाईसाठी भारत आणणार आंतरराष्ट्रीय दबाव
  • हा मुद्दा भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य व्यासपीठांवर मांडेल
  • मसूद अझरला भारताच्या हवाली करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जाईल

नवी दिल्ली: 'टाइम्स नाउ नवभारत'ने दहशतवादी मसूद अझर याच्या पाकिस्तानमधील तळाची सविस्तर माहिती दिली. या तळाचे फोटो प्रसिद्ध केले आणि मसूद अझर लोकांना चिथावणी देत असल्याचा ऑडिओ ऐकवला. या वृत्तांकनाची भारत सरकारने दखल घेतली. भारताचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी या विषयावर 'टाइम्स नाउ नवभारत'ला प्रतिक्रिया दिली. Union home minister state ajay mishra reacts on Times Now Navbharat expose on Masood Azhar

दहशतवादी मसूद अझर भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत आहे. या दहशतवाद्याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवले आहे. भारताने मसूद अझर विरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. यामुळे मसूद अझरला लपवणे आणि त्याला संरक्षण देणे हा गुन्हा आहे. पाकिस्तान मसूद अझरला लपवत असल्याचे तसेच त्याचे सैनिकांचा वापर करुन संरक्षण करत असल्याचे पुरावे 'टाइम्स नाउ नवभारत'च्या वृत्तातून पुढे आले आहेत. हा मुद्दा भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य व्यासपीठांवर मांडेल. मसूद अझरला भारताच्या हवाली करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जाईल, असे देशाचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा म्हणाले. गृह राज्यमंत्र्यांनी 'टाइम्स नाउ नवभारत'चे त्यांच्या शोध पत्रकारितेसाठी आणि धाडसी कामगिरीसाठी कौतुक केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी