Exclusive: सीबीएसई परीक्षा, विद्यापीठ परीक्षा, शाळा कधी सुरू होणार? या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री म्हणाले

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 08, 2020 | 18:22 IST | Times Now

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत विद्यापीठांच्या परीक्षा, सीबीएसई परीक्षा तसेच शाळा सुरू कधी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

student
कधी होणार शाळा सुरू? परीक्षांबद्दलचे अपडेट एका क्लिकवर 

थोडं पण कामाचं

  • केंद्रीय मंत्र्यांनी टाइम्स नाऊला दिली मुलाखत
  • मुलांच्या ज्या शाळा आहेत तेथे त्यांचे परीक्षांचे सेंटर्स असणार आहेत
  • मुलांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मुंबई: देशभरात लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. काही परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न उभे आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरिया निशांक यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नाबाबत सर्व उत्तरे दिली आहेत. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठांच्या परीक्षा, नीट जेईईसाठी सरकारचा निर्णय, शाळा सुरू होणे या प्रश्नांची उत्तरे दिली.

मेघा प्रसाद यांनी पोखरियाल निशांक यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी सर्व शंकांचे निरसन केले. पाहा काय म्हणाले केंद्रीय मंत्री

बोर्डाच्या परीक्षांसाठी घराजवळ सेंटर – सीबीएसईचे साधारण हजारो सेंटर आहेत. यावेळी मुलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असते. त्यात बऱ्याच अडचणी आहेत. मुलांच्या ज्या शाळा आहेत तेथे त्यांचे सेंटर्स असणार आहेत. त्यामुळे मुलांना इतर ठिकाणी जावे लागणार नाही. दरम्यान, मुले ज्या ठिकाणी आहेत याबाबतची सूचना ते शाळेला देतील आणि शाळा सीबीएसई बोर्डाला याची माहिती दिली जाईल. जेणेकरून सीबीएसई बोर्ड त्या शाळेला या मुलांच्या परीक्षा घेण्याबाबतच्या सूचना देईल. जुलैमध्ये ही परीक्षा होणार आहे.

जुलैमध्ये परीक्षा घेणे कितपत सुरक्षित? जेव्हा निशांक यांना विचारण्यात आले की जुलैमध्ये परीक्षा घेणे मुलांच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहे. यावर त्यांनी सांगितले की, जी परिस्थिती येईल त्याचे निरीक्षण केले जाईल. उरलेल्या विषयांच्या परीक्षा १ जुलैपासून परीक्षा घेणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे जे कडक नियम असतील जे शिक्षण विभागाकडून पाळले जातील.

यावेळी निशांक यांना शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत विचारले. तेव्हा ते म्हणाले, पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षेची काळजी आहे मात्र त्याचबरोबर मुलांना कशा प्रकारे स्वच्छता राखत शिक्षण देता येईल तसेच कोरोनापासून बचाव करता येईल ही सरकारची प्राथमिकता आहे. आम्ही सध्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत आहोत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिलेल्या सूचनांचे पालन राज्यांतील शाळांना करावे लागेल.

एन्ट्रंस परीक्षेबाबत अनेक विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न पडले आहेत. या परीक्षा उशिराने होत असल्याने मुलांवर मोठ्या प्रमाणात ताण आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मुलांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर योग्य ते सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुलांची संख्या अधिक असल्याने सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवावी लागेल.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा इंटरनेटचा प्रॉब्लेम होत असतो. येथील भागांमध्ये टूजी नेटवर्क चालते. केंद्रीय मंत्र्यांनी यावर उत्तर देताना म्हटले, अनेक ठिकाणी टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून मुलांना शिकवले जात आहे तसेच पुस्तके आणि स्टडी मटेरियलही या मुलांना उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे जम्मू-काश्मीरमधील मुलांना शिक्षणाच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत तसेच त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी