नुपुर शर्मा प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन, मंत्र्याने केला गौप्यस्फोट

Union Minister Prahlad Patel says Pakistan is jealous of India's growth and peace Creating this situation among a diverse population : नुपुर शर्मा यांना विरोध करण्यासाठी आंदोलनं आणि हिंसा सुरू आहे. कायदा हाती घेण्याचे प्रकार होत आहेत. यामागे पाकिस्तान आणि पाकिस्तानशी जवळीक साधणाऱ्यांचा हात आहे.

Union Minister Prahlad Patel says Pakistan is jealous of India's growth and peace Creating this situation among a diverse population
नुपुर शर्मा प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नुपुर शर्मा प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन
  • मंत्र्याने केला गौप्यस्फोट
  • जबलपूरमध्ये केला गौप्यस्फोट

Union Minister Prahlad Patel says Pakistan is jealous of India's growth and peace Creating this situation among a diverse population : नुपुर शर्मा यांना विरोध करण्यासाठी आंदोलनं आणि हिंसा सुरू आहे. कायदा हाती घेण्याचे प्रकार होत आहेत. यामागे पाकिस्तान आणि पाकिस्तानशी जवळीक साधणाऱ्यांचा हात आहे. हा गौप्यस्फोट केंद्रात मंत्री असलेल्या प्रल्हाद पटेल यांनी केला.

नुपुर शर्मा यांनी भाजपच्या प्रवक्तेपदी असताना पैगंबराविषयी एक वक्तव्य केले होते. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात (डीबेट शो) हे वक्तव्य करण्यात आले. या घटनेला काही दिवस झाल्यानंतर कार्यक्रमातील विशिष्ट भाग सोशल मीडियावर फिरवून एक वातावरण तयार करण्यात आले. यानंतर काही भागांमध्ये आंदोलनं आणि निवडक भागांमध्ये हिंसेचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे बोलताना केंद्रात मंत्री असलेल्या प्रल्हाद पटेल यांनी गौप्यस्फोट केला.

प्रगतीपथावरील भारताविषयी पाकिस्तानला मत्सर वाटतो. भारताशी स्पर्धा करणे जमत नाही म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानशी जवळीक साधणारी मंडळी इतर मार्गांनी भारतात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण केंद्र सरकार सतर्क आहे. कायद्याआधारे ज्यांच्यावर जी कारवाई व्हायला हवी ती होईल. पण बहुसांस्कृतिक देशात दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची मोठी संख्या हा एक चिंतेचा विषय आहे; असे केंद्रात मंत्री असलेले प्रल्हाद पटेल म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी