केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नेहमीच आपल्या स्पष्ट स्वभावामुळे चर्चेत असतात. तसंच तरूणाईमध्येही त्यांची क्रेझ पाहायला मिळते. इराणी या कधी सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टमुळे तर कधी त्यांच्या कामांमुळे नेहमी हायलाईट्समध्ये असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी हातात तलवारी घेतल्या आहेत. या तलवारी घेऊन त्या नृत्य करताना दिसताहेत. सध्या स्मृती इराणी यांच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या भाजपच्या खासदार स्मृती इराणी एका व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारी घेऊन देशभक्तीच्या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. यावेळी श्रीमती स्वामीनारायण गुरुकुल येथे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्या गुजरातमध्ये पोहोचल्या होत्या. सध्या गुजरातच्या भावनगरमध्ये स्वामी नारायण गुरूकूल येथे मूर्ती स्थापना महोत्सव सुरू आहे. या महोत्सवादरम्यान त्यांनी हातात तलवार घेऊन नृत्य केलं. या व्हिडिओत पाहिल्यावर दिसत की, त्या काही विद्यार्थिनींसोबत तलवार घेऊन नृत्य करत आहेत.
त्यांनी लक्ष्य या सिनेमातील कंधो से मिलते है कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलत हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं, या गाण्यावर नृत्य केलं. गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील सरदारनगर भागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकता कपूरची मालिका 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' मधून घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी तलवारीने आपल्या अनोख्या नृत्यनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या महोत्सवात महिलांसाठई एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तसंच तलवारीच्या लढाईप्रमाणेच मिळतं जुळतं 'तलवार रास' हे गुजरातमधील एक प्रसिद्ध पारंपारिक लोक नृत्य आहे.