भारताता कोळश्याचा पुरेसा साठा - केंद्रीय ऊर्जामंत्री

भारतात कोळश्याचा पुरेसा साठा आहे. दररोज खाणीतून काढल्या जाणाऱ्या कोळश्यामुळे साठ्यात वाढ होत आहे. देशात पुरेसा कोळसा उपलब्ध असल्यामुळे नियोजनानुसार विजेचा पुरवठा सुरू आहे; अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिली.

Union Power Minister RK Singh on over coal shortage at power plants no power crisis it was created unnecessarily
भारताता कोळश्याचा पुरेसा साठा - केंद्रीय ऊर्जामंत्री 

थोडं पण कामाचं

  • भारताता कोळश्याचा पुरेसा साठा - केंद्रीय ऊर्जामंत्री
  • देशात पुरेसा कोळसा उपलब्ध असल्यामुळे नियोजनानुसार विजेचा पुरवठा सुरू आहे
  • दररोज विजेची निर्मिती होत आहे आणि यापुढेही सुरू राहील

नवी दिल्ली: भारतात कोळश्याचा पुरेसा साठा आहे. दररोज खाणीतून काढल्या जाणाऱ्या कोळश्यामुळे साठ्यात वाढ होत आहे. देशात पुरेसा कोळसा उपलब्ध असल्यामुळे नियोजनानुसार विजेचा पुरवठा सुरू आहे; अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिली. गेल (GAIL) आणि टाटा पॉवर या दोन कंपन्यांकडून ग्राहकांना चुकीचे मेसेज पाठवण्यात आले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली; असेही केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले. 

देशात येणार अंधाराचे साम्राज्य, फक्त दिवस पुरेल इतकाच कोळसा 72 पॉवर प्लांटमध्ये उपलब्ध

मी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात आहे. कोळश्याचा साठा दररोज वाढत आहे. विजेची टंचाई निर्माण होण्याचा धोका नाही. कोल इंडिया कंपनीजवळ पुढील २४ दिवसांसाठी आवश्यक असलेला ४३० लाख टन कोळसा उपलब्ध आहे. या साठ्यात दररोज वाढ होत आहे. 

पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. देशातील औष्णिक ऊर्जा केंद्रांना दररोज मोठ्या प्रमाणावर कोळसा पुरवला जात आहे. येणाऱ्या दिवसांतील ऊर्जेची गरज डोळ्यांपुढे ठेवून नियोजन सुरू असल्याचे ऊर्जामंत्री म्हणाले. यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. देशात पुरेसा कोळसा आहे. दररोज विजेची निर्मिती होत आहे आणि यापुढेही सुरू राहील; अशी ग्वाही केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिली.

काँग्रेसच्या काही नेत्यांनी कोळसा टंचाई असल्याची चर्चा सुरू केली आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांच्याकडे चांगला विचार उरलेला नाही. मतं मिळत नाहीत म्हणून ते असं करत आहेत; असे ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले. 

दिल्लीत डिस्कॉमच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी कोळश्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. नियोजनानुसार कधीही प्रत्येक ऊर्जा निर्मिती संयंत्राकडे चार दिवसांचा कोळसा उपलब्ध असतो आणि दररोज कोळश्याचा साठा वाढत जातो. याच पद्धतीने सुरळीतपणे काम सुरू आहे. गेलने करार दोन दिवसांनी संपत आहे आणि त्याचे नूतनीकरण झाले नाही तर वीज निर्मितीसाठी आवश्यक गॅसचा पुरवठा करणार नाही असा संदेश बवाना ऊर्जा निर्मिती केंद्राला पाठवला. ही एक तांत्रिक बाब आहे. करार नियमितपणे होतात आणि त्यांचे नूतनीकरण वेळोवेळी होते. पण या संदेशाचा राजकीय वापर झाला आणि कोळसा टंचाई आहे आता वीज टंचाई सुरू होणार अशी अफवा पसरविण्यास सुरुवात झाल्याचा आरोप ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी केला. गेल आणि टाटा पॉवर कंपनीला अफवा पसरविण्यास कारणीभूत ठरतील असे संदेश ग्राहकांना पाठवू नका; असे सांगितल्याचे ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी