वडील आम्हाला मारून टाकतील, भाजपच्या आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 11, 2019 | 12:39 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एका भाजपच्या आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने दलित मुलाशी विवाह केल्याने तिचा पती आणि सासरच्यांना तिच्या वडिलांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.

mla daughter
आमदाराची मुलगी 

थोडं पण कामाचं

  • उत्तर प्रदेशात घडली धटना
  • आमदाराच्या मुलीने शेअर केला व्हिडिओ
  • वडिलांकडू जिवाला धोका असल्याचे विधान

मुंबई : सध्या आपण २१व्या शतकात जगत आहोत. येथे लोक समाजात एकत्र प्रगती करत आहेत. अनेक ठिकाणी समाजातील भेदभाव दूर सारून एकत्र येत आहोत. मात्र काही ठिकाणी जातीचा इतका घट्ट पगडा अजूनही आहे. आंतरजातीय विवाहांना अद्यापही समाजात तितकी मान्यता दिली जात नाही. फार कमी अशी जोडपी असतात ज्यांनी आंतरजातीय विवाह करून त्यांनी कुटुंबाने आणि समाजाने स्वीकारले आहे. 

ही समस्या केवळ गावांमध्ये नाहीये तर शहरांमध्येही असेच चित्र आहे. अद्यापही लोकांचे याबाबतचे विचार काही बदलले नाहीत. आपल्या मुलाने अथवा मुलीने जातीबाहेर लग्न केल्यास अनेकांच्या कुटुंबियांना ते मान्यच होत नाही. अनेकदा ही कुटुंबे आपल्या मुलांचा खून करण्यासही मागे पुढे पाहत आहे. अशा हॉनर किलिंगच्या अनेक घटना आपण ऐकत पाहत असतो. याच गोष्टीशी सबंधित उत्तर प्रदेशच्या एका आमदाच्या मुलीची व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिने आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिच्या घरच्यांपासून तिचे पती आणि सासरच्या व्यक्तींना धोका असल्याचे तिने या व्हिडिओत म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशच्या बरैली जिल्ह्यातील बिठारी चेनपूरचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. बुधवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साक्षीने दलित तरुण अजितेश कुमार(२९) लग्नाची घोषणा केली आहे. तसेच आपले कुटुंब आणि वडिलांना अशी विनंती केली आहे की तिच्या घरच्यांशी हे लग्न स्वीकारावं आणि त्यांना शांततेने जगू द्यावे. तिने असाही आरोप केला आहे की तिच्या घरच्यांनी तिच्या मागावर गुंड पाठवले आहेत ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये ती असं म्हणते की, मी माझ्या मर्जीने लग्न करत आहे. आमच्यामागे तुम्ही जे काही गुंड पाठवले आहेत त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी पळा पळता आम्ही त्रस्त झालो आहोत. 

ती हे ही म्हणाली की जर तिचे वडील आणि कुटुंबीय तिच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच तिचा जीव घेतील. तिने आपले वडील, भाऊ आणि आणखी एका व्यक्तीपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना धमकी दिली आहे की अजितेश आणि त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहा अन्यथा त्यांना याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. यासोबतच तिने बरेली संसद आणि प्रशासनाकडूनही मदत मागितली आहे तसचे वडिलांची मदत करू नये असेही सांगितले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या आमदाराची कोणतीही प्रतिक्रिया आलेला नाही. तर पोलीस महानिरीक्षक आर के पांडे यांना जेव्हा सोशल मीडियावरील या व्हिडिओ माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एसएसपीला या नवदाम्पत्याची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वडील आम्हाला मारून टाकतील, भाजपच्या आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ Description: एका भाजपच्या आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने दलित मुलाशी विवाह केल्याने तिचा पती आणि सासरच्यांना तिच्या वडिलांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles