Yogi Adityanath: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Death Threat to Yogi Adityanath: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. 

UP CM Yogi Adityanath get death threat letter watch video
Yogi Adityanath: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: BCCL

Yogi Adityanath: उत्तरप्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या फोटोवर क्रॉस निशाण ओढण्यात आलेला फोटोही समोर आला आहे. लखनऊ येथून हे लेटर पाठवण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच जनहित याचिका कार्यकर्ते देवेंद्र तिवारी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी आलमबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. मोहम्मद अजमल नावाच्या व्यक्तीने हे लेटर पाठवलं आहे. लेटरमध्ये लिहिलं आहे की, पुढचा नंबर या दोघांचा आहे. अजमल याने पाठवलेल्या या पत्रात आपला पत्ता देवबंद बरेली असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र यांनी पीआयएल दाखल करणं बंद केलं नाही तर त्याच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्ब उडवून देण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी