उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारीसाठी पक्षांतराला उत, योगी सरकारच्या दोन मंत्र्यांनी दिला राजीनामा

UP election dara singh chauhan resign from minister post yogi aditynath govt : योगी सरकारचे  मंत्री दारा सिंह चौहान आणि स्वामी प्रसाद मौर्य या दोघांनी तसेच भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला. यामुळे राजीनामा देऊन भाजप सोडणाऱ्यांची संख्या पाच झाली. राजीनामा देणारे पाच जण समाजवादी पक्षाच्या वाटेवर

UP election dara singh chauhan resign from minister post yogi aditynath govt
उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारीसाठी पक्षांतराला उत, योगी सरकारच्या दोन मंत्र्यांनी दिला राजीनामा 
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारीसाठी पक्षांतराला उत, योगी सरकारच्या दोन मंत्र्यांनी दिला राजीनामा
  • योगी सरकारचे  मंत्री दारा सिंह चौहान आणि स्वामी प्रसाद मौर्य या दोघांनी तसेच भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला
  • दारा सिंह चौहान समावादी पक्षात दाखल

UP election dara singh chauhan resign from minister post yogi aditynath govt : लखनौ : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारीसाठी पक्षांतराला उत आला आहे. भाजपने कामगिरीच्या आधारे उमेदवारी जाहीर होणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यानंतर योगी सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामा देऊन भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी भाजपच्या तीन आमदारांनीही राजीनामा देऊन पक्ष सोडला आहे. 

योगी सरकारचे  मंत्री दारा सिंह चौहान आणि स्वामी प्रसाद मौर्य या दोघांनी तसेच भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला. यामुळे राजीनामा देऊन भाजप सोडणाऱ्यांची संख्या पाच झाली. राजीनामा देणारे पाच जण समाजवादी पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

दारा सिंह यांनी थोड्या वेळापूर्वी समाजवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर योगी सरकारचे उपमुख्यमंत्री  केशव प्रसाद मौर्य यांनी दुःख व्यक्त केले. एक सहकारी पक्ष सोडून चुकीच्या वाटेवर भरकटल्याचे दुःख आहे; असे मौर्य यांनी ट्वीटमध्ये नमूद केले. समाजवादी पक्षात प्रवेश करणे म्हणजे बुडत्या नावेत प्रवेश करण्यासारखे असल्याचे मत मौर्य यांनी व्यक्त केले. मौर्य यांनी दारा सिंह यांना पुनर्विचार करा; असे आवाहन केले आहे. तर समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांनी दारा सिंह यांचे जाहीर स्वागत केले.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात, मणीपूरमध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एका टप्प्यात निवडणूक; मतमोजणी १० मार्चला होणार

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे सात टप्पे

पहिला टप्पा - १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा - १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पा - २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पा - २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा - ३ मार्च २०२२
सातवा टप्पा - ७ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्याच्या निवडणुकीचा एकमेव टप्पा

मतदान - १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

मणीपूरच्या निवडणुकीचे दोन टप्पे

मतदान पहिला टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
मतदान दुसरा टप्पा - ३ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी