लग्नात महिला डान्सर करत होती डान्स, थांबल्यावर चेहऱ्यावर मारली गोळी , पहा [VIDEO]

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 12, 2019 | 23:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये लग्नावेळी आयोजित एका समारंभात महिलेने नाचणे बंद केल्यावर तिच्या चेहऱ्यावर गोळी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 

up female dancer was dancing in marriage ceremony shot when she stopped crime news in marathi google news
लग्नात महिला डान्सर करत होती डान्स, थांबल्यावर चेहऱ्यावर मारली गोळी , पहा [VIDEO]  |  फोटो सौजन्य: Times Now

लखनऊ :  उत्तर प्रदेशच्या चित्रकूट येथे गेल्या आठवड्यात एक महिला डान्सर लग्न समारंभात डान्स करत होती. अचानक तिची तब्येत खराब झाली. त्यामुळे ती डान्स करता करता थांबली. त्यानंतर एका माथेफिरूने तिच्या चेहऱ्यावर गोळी झाडली. आता तिची स्थिती नाजूक आहे. ही युवती डान्स ग्रुपची सदस्य होती. ती आपल्या सह कलाकारांसोबत मंचावर डान्स करत होती. एक मिनिटाच्या या व्हिडिओ क्लीपमधून समोर येते की एक माथेफिरू दारूच्या नशेत होता आणि महिलेसा सांगत होता डान्स थांबला तर गोळी चालेल. दुसऱ्या एकाने म्हटले की सुधीर भैया आप गोली चला ही दो... त्यानंतर अचानक महिलेला मागून गोळी मारली जाते. ती गोळी तिच्या चेहऱ्याला लागते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक जण हा प्रकार पाहून हैराण होतो. 

व्हिडिओ क्लीपनुसार महिला डान्सर थांबल्यावर उपस्थित व्यक्ती म्हणतो गोली चल जाएगी, त्यावेळी त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती म्हणतो सुधीर भैया आप गोली चला ही दो. त्याच वेळी चेहऱ्यावर गोळी लागते आणि महिला डान्सर रक्ताने माखलेल्या अवस्थेत स्टेजवर पडते. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध केस दाखल केली आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. महिलेला कानपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी