Shocking News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानं लग्नास दिला नकार, प्रेयसीनं वस्ताऱ्यानं चिरला गळा

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 14:06 IST

Ghaziabad Murder Case: गाझियाबादमध्ये हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने प्रेयसी प्रीती शर्माने प्रियकर फिरोजचा गळा चिरून खून केला. ट्रॉली बॅगमध्ये प्रियकराचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी प्रितीला पकडले. आम्ही तुम्हाला सांगतो की दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

ghaziabad murder casea
उत्तरप्रदेशमध्ये प्रेयसीनं केली प्रियकराची हत्या 
थोडं पण कामाचं
  • आरोपी प्रीतीने प्रियकर फिरोजचा गळा वस्तराने चिरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
  • हत्या केल्यानंतर प्रीतीने दिल्लीतून एक काळी ट्रॉली बॅग आणली आणि त्यात प्रियकराचा मृतदेह ठेवून घेऊन जाण्याची तयारी करू लागली.
  • लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने (girlfriend) प्रियकराची (boyfriend) हत्या केल्याची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेश: Ghaziabad Murder: गाझियाबादमधून (Ghaziabad)  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने (girlfriend)  प्रियकराची  (boyfriend) हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी प्रीतीने प्रियकर फिरोजचा गळा वस्तराने चिरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. हत्या केल्यानंतर प्रीतीने दिल्लीतून एक काळी ट्रॉली बॅग आणली आणि त्यात प्रियकराचा मृतदेह ठेवून घेऊन जाण्याची तयारी करू लागली. त्याच दरम्याना पोलिसांना संशय आल्यानं महिलेची चौकशी केली. चौकशी केली असता या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी प्रीतीला अटक केली आहे. 

बॅगमध्ये भरला होता मृतदेह

तुलसी निकेतन परिसरात प्रियकराचा मृतदेह सुटकेसमध्ये घेऊन जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. प्रीती शर्मा नावाची महिला फिरोजसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर त्यानं लग्नास नकार दिला. नकार दिल्यानं संतापलेल्या आरोपी प्रीतीनं फिरोजचा वस्तरानं गळा चिरून हत्या केली.

अधिक वाचा- ​महागड्या केराटिन ट्रीटमेंटचे 'हे' आहेत साइड इफेक्ट्स

हत्या केल्यानंतर प्रीतीने दिल्लीहून एक मोठी ट्रॉली बॅग आणली आणि फिरोजचा मृतदेह त्यात भरून घेऊन जाण्याची सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी प्रितीला थांबवून तिची झडती घेतली. तिची बॅग उघडली असता आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी तात्काळ प्रितीला अटक केली. प्रीती ही सुटकेस गाझियाबाद रेल्वे स्थानकावर कोणत्या तरी ट्रेनमध्ये ठेवणार होती.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रीती शर्माचं यापूर्वी दीपक यादव याच्याशी लग्न झाले होते, मात्र चार वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती फिरोजसोबत तुलसी निकेतनमधील फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. शर्मा फिरोजवर लग्नासाठी दबाव टाकत होती पण तो तयार होत नव्हता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी