Verdict On Ayodhya:अयोध्येतला राममंदिराचा मार्ग मोकळा, वादग्रस्त जागा रामलल्लाचीच

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. या निकालानंतर अयोध्येतला राममंदिराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Suprme court
LIVE UPDATES Verdict On Ayodhya: आज अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल  |  फोटो सौजन्य: ANI

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं.  सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराची निर्मिती होणार आहे.   16 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची निकाल16 ऑक्टोबर 2019 पासून राखून ठेवला आहे. आता पाच न्यायाधीशांच्या या खंडपीठानं आज आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाला शनिवारीची सुट्टी असते. मात्र या ऐतिहासिक निकालासाठी आज सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रामलल्ला वादग्रस्त जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी बोर्डाला दुसरी पर्यायी जागा मशीदीसाठी दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अयोध्या निकाल लाइव्ह अपडेट्स

 1. सुन्नी वक्फ बोर्डाकडून निकालाचं स्वागत, संपूर्ण 2.77 संपूर्ण जागा रामलल्लाचीच
 2. वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही. वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच
 3. वादग्रस्त जागा रामलल्लाला बहाल.ट्र्स्ट बनवून मंदिर बनवा.  मंदिर निर्माणासाठी नियम बनवा- सर्वोच्च न्यायालय
 4. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, अयोध्येतला राममंदिराचा मार्ग मोकळा
 5. अलाहाबाद हायकोर्टाचे त्रिभाजन फेटाळले
 6. सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्या. सुन्नी बोर्डाला दुसरी अन्यत्र जमिन देणं गरजेचं, मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळेल- सर्वोच्च न्यायालय
 7. अनेक शतकं हिंदू पूजा करत होते. केंद्र सरकारनं ३ महिन्यांत. 1956 पूर्वी हिंदूंकडून वादग्रस्त जागेवर पूजा, 1856-57 ला नमाज पठणाचे पुरावे नाहीत.
 8. जमिनीचे त्रिभाजन अयोग्य.- सर्वोच्च न्यायालय
 9. रामलल्लानं ग्रंथाचे दाखले दिलेत. वादग्रस्त वास्तू पाडणं बेकायदेशीर. वादग्रस्त वास्तू पाडून कायद्याचं उल्लंघन- सर्वोच्च न्यायालय
 10. इंग्रजांमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये वाद झाला. मुस्लिम पक्ष ताबा सिद्द करण्यासाठी अपयशी ठरले. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे यावर कोणताही वाद नाही.
 11. इंग्रजांपूर्वी हिंदू चबुतरा पूजा करत होते. हिंदूंचा दावा खोटा नाही. 1856 पूर्वीही हिंदू आत पूजा करत होते. पूजा थांबवल्यानं बाहेर चबुतरा बांधला. इंग्रजांनी विभाजनासाठी रेलिंग बनवले होते.
 12. बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीखाली मोठी इमारत होती.
 13. दावे फक्त आस्थेनं सिद्ध होत नाही. रामलल्लानं ग्रंथांचे पुरावे दिलेत. चौथरा आणि सीता की रसोई यांचं अस्तित्त्वं मान्य. रामलल्चा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख. 12 व्या आणि 16 व्या शतकाचे कोणतेच पुरावे नाहीत. 
 14. रामाचा जन्म झाल्याची हिंदूची आस्था, हिंदूची आस्था चुकीची याला पुरावे नाहीत, हिंदू परिक्रमा करत होते- SC
 15. हिंदू अयोध्येस रामजन्मभूमी मानतात, वादग्रस्त जागी हिंदू पूजा करत होते, मशिद रिकाम्या जागी बनली नाही,खोदकामातील अवशेष इस्लामी नव्हते- SC
 16. वादग्रस्त वास्तू जुने, स्तंभ, दगड वापरले. मशिदीच्या जागी वास्तू होती.  ASI च्या अहवालाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही- सर्वोच्च न्यायालय
 17. मशिद कधी बांधली त्याने फरक पडत नाही, निर्मोही आखाड्यचा दावा फेटाळला, निर्मोही आखाडा सेवाधार नाही. रामलल्ला कायदेशीररित्या पक्षकार मानलं - SC
 18. 1949 ला मूर्ती  ठेवल्या गेल्या, बाबरच्या काळात मशिदीचे बांधकाम- SC
 19. सर्वोच्च न्यायालयाचे निकालावर एकमत, 5-0 नं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, पाच न्यायमूर्तींचे निकालावर एकमत
 20. 30 मिनिटांत निकाल देऊ सरन्यायाधीश गोगोईंनी स्पष्ट केलं
 21. शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळण्यात आली
 22. सरन्यायाधीशांनी सर्वांना शांत केले. सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचनाला सुरूवात
 23. पक्षकारही न्यायालयात दाखल, फैसल्याची कॉपी कोर्टरूममध्ये आणण्यात आली
 24. सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायालयात दाखल, न्यायाधीश एस. ए. बोबडेही न्यायालयात
 25. अमित शहा यांनी भाजप प्रवक्त्यांची बोलावली बैठक
 26. अयोध्या विवाद प्रकरण, धुळ्यात पहिला गुन्हा दाखल, दोघांना अटक
 27. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. शांतात, संयमाचं वातावरण राखा, नितीन गडकरी यांचं आवाहन
 28. उत्तरप्रदेशातील अलीगढमध्ये इंटरनेट सेवा बंद, राजस्थानमधील भरतपुरमध्ये उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद 
 29. सर्वांनी शांतता राखण्याचं आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन, अयोध्या निकालाआधी भागवत यांचं आवाहन
 30. अयोध्येत सीआरपीएफचे 4 हजार जवान तैनात 
 31. महाराष्ट्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त
 32. जम्मू- काश्मीरमध्ये संचारबंदी लागू
 33. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, राजस्थानमधील सर्व शाळा, कॉलेज बंद
 34. मुंबई पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावप चिथावणीखोर, आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका.संयम, सलोखा, शांतता राखण्याचं आवाहन
 35. निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना शांततेचं आवाहन
 36. अयोध्येत जमावबंदी लागू, शाळा- कॉलेज सोमवारपर्यंत बंद, अयोध्या शहरात ड्रोन कॅमेऱ्यांची नजर 
 37. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त, अयोध्येत मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात
 38. सर्वोच्च न्यायालयाबाहेर कडेकोड बंदोबस्त तैनात
 39. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं खंडपीठ निर्णय देणार, पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ आज फैसला सुनावणार
 40. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरू होण्याची शक्यता
 41. आज अयोध्या प्रकरणाचा निकाल आज लागणार

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी