अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष होतं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराची निर्मिती होणार आहे. 16 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची निकाल16 ऑक्टोबर 2019 पासून राखून ठेवला आहे. आता पाच न्यायाधीशांच्या या खंडपीठानं आज आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाला शनिवारीची सुट्टी असते. मात्र या ऐतिहासिक निकालासाठी आज सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रामलल्ला वादग्रस्त जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी बोर्डाला दुसरी पर्यायी जागा मशीदीसाठी दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर अयोध्येत वादग्रस्त जमिनीवर राम मंदिराची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.