Confusion over Agneepath :अग्निपथ योजनेतील हे गैरसमज सरकारने केले दूर, विरोध करण्याअगोदर तरतूदी समजून घेण्याचा दावा

देशभरातून अग्निपथ योजनेला तरुण विरोध करत आहेत. मात्र तरुणांचा गैरसमज झाला असून या योजनेतील तरतुदी नीट समजावून घेणं गरजेचं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

Confusion over Agneepath
अग्निपथ योजनेतील हे 7 गैरसमज सरकारने केले दूर  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अग्निपथ योजनेबाबत तरुणांमध्ये संभ्रम
  • सरकारकडून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
  • तरुणांच्या भविष्याची काळजी असल्याचा सरकारचा दावा

Confusion over Agneepath | सुरक्षा दलांतील भरतीसंदर्भात केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेवरून देशातील तरुण संतप्त झाले आहेत. सैन्यात केवळ चारच वर्षांच्या नोकरीचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आमच्या पुढील भवितव्याचं काय होणार, हा प्रश्न घेऊन देशातील तरुणाई रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र आहे. मात्र या योजनेला विरोध करण्यापूर्वी त्याचं स्वरूप आणि तरतुदी समजून घेणं गरजेचं असल्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. 

अग्निविरांच्या आर्थिक सुरक्षेचं काय?

सुरक्षा दलातील चार वर्षांची सेवा झाल्यानंतर जर कुणाला उद्योग करायचा असेल, तर त्यासाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज दिलं जाणार आहे. बँकेतून विविध कर्ज घेण्याचीही योजना आहे. ज्यांना अधिक शिकायची इच्छा आहे त्यांना बारावीच्या समकक्ष सर्टिफिकेट दिलं जाईल आणि पुढच्या शिक्षणासाठी ब्रिजिंग कोर्स करावा लागेल. ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांना सीआरपीएफच्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. इतर क्षेत्रांतही नोकरीच्या संधींचा विचार सरकार करणार आहे. 

तरुणांची संधी कमी होणार की वाढणार?

या योजनेमुळे तरुणांना सुरक्षादलात मिळणारी संधी कमी होईल, अशी शंका आहे. मात्र प्रत्यक्षात ही संख्या वाढणार असल्याचंं सरकाररचं म्हणणं आहे. आगामी काळात सैन्यात होणारी भरती ही सध्याच्या तुलनेत तीन पट असणार आहे. 

रेजिमेंटमधील बंधुभाव कमी होणार?

नव्या रचनेमुळे हा बंधुभाव कमी होण्याऐवजी वाढीसच लागेल. आपापल्या बुद्धीमत्तेच्या क्षमतेनुसार तरुण वेगवेगळ्या रेजिमेटंमध्ये दाखल होणार असल्यामुळे तरुणांची ताकद, संख्या आणि क्षमता तिन्हीत वाढ होईल, असा अंदाज आहे. 

अधिक वाचा - pm modi gujarat visit, पावागड शक्तिपीठ महाकाली मंदिरावर शेकडो वर्षांनी ध्वजारोहण, पीएम मोदी करणार ध्वजारोहण

सैन्याच्या क्षमतेवर परिणाम होणार?

या योजनेमुळे आपल्या सुरक्षा दलांच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल, अशी भिती व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात जगातील अनेक प्रगत देशांमध्ये अशाच प्रकारच्या संक्षिप्त सेवा आहेत आणि सैन्यात अधिकाधिक तरुण असल्याचा देशाला सुरक्षेसाठी चांगलाच फायादा होतो. नोकरीवर घेताना आणि चार वर्षांनी पुन्हा एकदा तरुणांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. 

21 वर्षांचे तरुण सुरक्षेसाठी परिपक्व आहेत का?

जगातील अनेक प्रगत देशांच्या सेनेचं प्रतिनिधित्व ही तरुण मुलंच करत असतता. अर्थात कुठल्याही परिस्थितीत अनुभवी लोकांपेक्षा तरुणांचं प्रमाण अधिक कधीच असणार नाही. भविष्यात याचं प्रमाण 50-50 टक्के असेल, असा अंदाज संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

अधिक वाचा - रेस्टॉरंटमध्ये जेवायचंय तर आधी भिंत चाटा

दहशतवाद वाढेल

चार वर्षांनी शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण समाजासाठी धोकादायक ठरेल, अशीही चर्चा आहे. वास्तविक, हा भारतीय सैन्याचा अपमान असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आतापर्यंत दरवर्षी हजारो सैनिक सेवानिवृत्त झाले आहेत, मात्र आतापर्यंत कुणीच देशभक्तीचा मार्ग सोडला नाही, असा दावा सरकारनं केला आहे. 

अनेक आजी-माजी सैनिकी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चाविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी आदर राखावा, असं आवाहन सरकारनं केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी