डिअर कमल सर, देशाची विभागणी करण्याचे काम करून नका - विवेक ओबेरॉय

लोकल ते ग्लोबल
Updated May 13, 2019 | 14:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे कमल हासन यांनी रविवारी वादग्रस्त विधान केले. भारताचा पहिला दहशतवाही हा हिंदू होता असे त्यांनी विधान केले. यावर विवेक ऑबेरॉयने प्रतिक्रिया दिली आहे.

vivek oberoi
विवेक ओबेरॉय  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: दाक्षिणात्या सिनेमा तसेच हिंदी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी रविवारी वादग्रस्त विधान केले की स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर बॉलिवूडचा अभिनेता विवेक ओबेरॉयने टाईम्स नाऊच्या ट्वीटला रिट्वीट करताना म्हटले आहे की, डिअर कमल सर तुम्ही एक महान कलाकार आहात. जसेच कलेला कोणताही धर्म नसतो त्याप्रमाणे दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. तुम्ही म्हणू शकता की गोडसे दहशतवादी होते. मात्र तुम्ही याच हिंदू कसे सामील करू शकता? कारण तुम्ही मुस्लिम बहुल भागात मत मागत होता. प्लीज सर, एक छोट्या कलाकाराकडून तुम्हाला एक विनवणी आहे की या देशाची विभागणी करण्याचे काम करू नका. आम्ही सगळे एक आहोत जय हिंद. 

मक्कल निधीन मैयम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी तामिळनाडूच्या अरवाकुरीची विधानसभेच्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी प्रचारसभा घेतली होती. यादरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. ते पुढे म्हणाले, मी असा एक स्वाभिमानी आहे ज्यांना भारतात समानता हवी आहे. हा मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून मी हे बोलत नाही आहे. मात्र महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर मी हे विधान करत आङे. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे आहे. त्यांच्यापासूनच दहशतवादाला सुरूवात झाली. 

हासन यांनी महात्मा गांधी यांच्या १९४८मध्ये झालेल्या हत्येचा हवाला देत सांगितले की, या हत्येचे उत्तर शोधण्यासाठी मी आलो आहे. ३० जानेवारी १९४८ला नथुराम गोडसेनी दिल्लीमध्ये प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती. 

विवेक ओबेरॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम केले आहे. विवेकने पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली. दरम्यान, हा सिनेमा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रिलीज होऊ शकला नाही. हा सिनेमा लोकसभा निवडणुकीचा २३ मेला निकाल जाहीर झाल्यानंतर २४ मेला रिलीज होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी