मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून, कॅमेरात कैद झाले अद्भूत दृश्य, पाहा व्हिडिओ

Flood Video: देशाच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नाचनी मानसियारी मार्गावरील एक बांधकामाधीन पूल वाहून गेला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Watch shocking  Uttarakhad video bridge washed away due to heavy rain
Video : मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून  
थोडं पण कामाचं
  • देशाच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
  • मुसळधार पावसामुळे नाचनी मानसियारी मार्गावरील एक बांधकामाधीन पूल वाहून गेला.
  •  उत्तराखंडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे,

Flood Viral Video: देशातील अनेक भागात हवामान झपाट्याने बदलत आहे. कडाक्याच्या उन्हात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 

 उत्तराखंडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अतिवृष्टीमुळे एक बांधकाम सुरू असलेला पूल वाहून गेला आहे. नाचनी मानसियारी मार्गावर पूल बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या भागात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. 

मंगळवारी सकाळीही या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पूल वाहून गेला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा भाग आपत्तीग्रस्त क्षेत्रात येतो. कसे होते ते व्हिडिओमध्ये पहा.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी