काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी पीएमओ जबाबदार, असदुद्दीन ओवेसींचा मोदींवर हल्लाबोल

काश्मिरी पंडितांच्या हत्येप्रकरणी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Watch Video asaduddin owaisi targets pm narendra modi over the killing of kashmiri pandits read in marathi
असदुद्दीन ओवेसींचा मोदींवर हल्लाबोल  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  कुलगाममध्ये 31 मे रोजी दहशतवाद्यांनी रजनी बाला या महिला शिक्षिकेची हत्या केली आणि दोन दिवसांनी 2 जून रोजी राजस्थानमधील बँक मॅनेजर विजय कुमार यांची हत्या केली. काश्मीर फ्रीडम फायटर्स ऑर्गनायझेशनने विजय कुमारच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि लोकसंख्या बदलण्याचा हा परिणाम असेल असे म्हटले आहे. या सगळ्या दरम्यान दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि NSA अजित डोवाल यांच्यात मोठी बैठक झाली. 3 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर एक मोठी बैठक होणार आहे. याशिवाय AIMAIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येचा हवाला देत पंतप्रधान मोदींना घेरले. (Watch Video asaduddin owaisi targets pm narendra modi over the killing of kashmiri pandits read in marathi )

ओवेसी म्हणाले की, सरकार 1990 च्या चुकीची पुनरावृत्ती करत आहे. सुरक्षा दल खासगी वाहनांतून जात आहेत, त्यांचे स्फोट होत आहेत. याला सर्वस्वी PMO जबाबदार आहे. सरकार चालवणे हे सरकारचे काम आहे, , पण सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, ही तर हद्द झाली.  

सरकारचे लोक चित्रपटाची जाहिरात करणार की काश्मिरी पंडितांना संरक्षण देणार? काश्मिरी पंडित खोरे सोडणार असल्याचे सांगत आहेत. आज जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी चर्चा होत नाहीये. भाजप स्वतःच्या फायद्यासाठी काश्मिरी हिंदूंचा सहारा घेत असल्याचा आरोप एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांनी केला. काश्मीरमध्ये सध्या येथे स्थायिक झालेले हिंदू पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी