VIDEO: विमान न मिळाल्याने महिलेला आला पॅनिक हार्ट अटॅक, आता एअर इंडियाने केला खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated May 12, 2022 | 16:12 IST

दिल्ली विमानतळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला बेशुद्ध पडली आहे. असे सांगितले जात आहे की महिलेला फ्लाइट पकडण्याची परवानगी नव्हती, ज्यामुळे तिला घाबरून हृदयविकाराचा झटका आला.

थोडं पण कामाचं
  • देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियानेही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. या महिलेला फ्लाइटमध्ये बसू दिले नाही, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  (Watch Video woman panic  heart attack after she refuse to get on flight on delhi international airport read in marathi )

त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियानेही या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. बोर्डिंग गेट बंद झाल्यानंतर तिघे प्रवासी आल्याचे एअर इंडियाने सांगितले. गेट बंद होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा त्याचे नाव जाहीर केले होते. येथे, कुटुंबीयांचे म्हणणे आहे की महिलेला फ्लाइट पकडण्याची परवानगी नव्हती, ज्यामुळे तिला घाबरून हृदयविकाराचा झटका आला. व्हिडिओमध्ये पाहा संपूर्ण प्रकरण काय आहे?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी