नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत भारताचे आणखी एक पाऊल पुढे!: अमित शहा

We have gone one step further in the fight against Naxalites Amit Shah : भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ते बिहारमधील किशनगंज येथे एका सभेत बोलत होते.

We have gone one step further in the fight against Naxalites Amit Shah
नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत भारताचे आणखी एक पाऊल पुढे!: अमित शहा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत भारताचे आणखी एक पाऊल पुढे!: अमित शहा
  • सीमेवरून होणाऱ्या सर्व देशविरोधी कारवायांना आळा घालणे यासाठी ठोस उपाय सुरू आहेत
  • एसएसबीचे जवान प्रभावीरित्या कार्यरत

We have gone one step further in the fight against Naxalites Amit Shah : भारताच्या सर्व सीमांचे रक्षण करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ते बिहारमधील किशनगंज येथे एका सभेत बोलत होते. याआधी त्यांनी बिहारच्या सीमांचल भागाचा अर्थात सीमावर्ती जिल्ह्यांचा दौरा केला.

सीमेवरून होणाऱ्या सर्व प्रकारच्या तस्करीला आळा घालणे, सीमेवरील घुसखोरी आणि इतर गुन्हेगारी स्वरुपाच्या तसेच देशविरोधी कारवायांना आळा घालणे यासाठी ठोस उपाय सुरू आहेत. एसएसबीचे (Sashastra Seema Bal - SSB) जवान हे काम अतिशय प्रभावीरित्या करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. एसएसबीच्या जवानांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याची माहिती पण त्यांनी दिली. नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत भारताचे आणखी एक पाऊल पुढे पडल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रगतीचे सर्वाधिक श्रेय सीमेच्या रक्षण करणाऱ्या जवानांना जाते असेही अमित शहा म्हणाले.

चर्चेतल्या सेलिब्रेटींची प्रसिद्धीपासून दूर असलेली मुलं

सनी लिओनीचा ट्रॅडिशनल हॉट अवतार

अमित शहा यांनी बिहार दौऱ्याच्या निमित्ताने सीमांचल भागातील प्रसिद्ध काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच पूजा केली. हे मंदिर सीमांचल भागातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजले जाते. किशनगंज येथील सुमारे 50 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. या भागात शुक्रवारच्या रात्री मुक्काम केल्यानंतर शनिवारी (24 सप्टेंबरल 2022) सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुढी काली मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले तसेच पूजा केली. 

मंदिरात अमित शहा यांनी पूजा आणि आरती केल्याचा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला. बुढी काली मंदिर हे एका मुस्लिम नवाबाने दान केलेल्या भूखंडावर बांधले आहे असे स्थानिक सांगतात. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवार 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी पूर्णिया जिल्ह्याचा दौरा केला. तिथे भाजपच्या रॅलीत सहभागी झाले. संध्याकाळी किशनगंज येथे पोहोचले. किशनगंज येथे केंद्रीय गृहमंत्र्यांचा रात्री मुक्काम होता. या काळात त्यांनी किशनगंजमध्ये भाजपच्या बिहारमधील आमदार आणि खासदारांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी