Go Air Flight G8-151 : गो एअर कंपनीच्या दिल्ली - गुवाहाटी जी८-१५१ विमानाच्या विंडशिल्डला तडा गेला. विमानाच्या काचेला तडा गेला. यानंतर वैमानिकाने विमान दिल्लीत परत नेण्याची तयारी सुरू केली. पण नियंत्रण कक्षाने प्रतिकूल वातावरणामुळे विमान जयपूरला नेण्याचे निर्देश दिले. विमान जयपूर येथे सुरक्षितरित्या उतरविण्यात आले. यानंतर गुवाहाटी येथे जाणार असलेल्या प्रवाशांसाठी सुरक्षित विमान प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.
विमानाने दुपारी १२.४० वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले आणि थोड्याच वेळात काचेला तडा गेला. नियोजनानुसार विमान दुपारी २.५५ वाजता गुवाहाटी येथे पोहोचणे अपेक्षित होते. पण काचेला तडा गेल्यामुळे विमानाच्या फ्लाइट प्लॅनमध्ये आयत्यावेळी बदल करण्यात आले. विमान जयपूरला नेण्यात आले. यानंतर जयपूर येथून गुवाहाटीसाठी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली. विमानातील प्रवासी सुरक्षितरित्या गुवाहाटी येथे पोहोचले.