पाकिस्तानचे एफ-१६ पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र

Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman awarded Vir Chakra today, Pakistani F-16 fighter plane was shot down विंग कमांडर म्हणून कार्यरत असताना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडण्याची कामगिरी करणाऱ्या आणि आता बढती मिळालेल्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman awarded Vir Chakra today, Pakistani F-16 fighter plane was shot down
पाकिस्तानचे एफ-१६ पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानचे एफ-१६ पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र
  • मेजर विभूति शंकर ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र
  • नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र

Wing Commander (now Group Captain) Abhinandan Varthaman awarded Vir Chakra today, Pakistani F-16 fighter plane was shot down नवी दिल्ली: विंग कमांडर म्हणून कार्यरत असताना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडण्याची कामगिरी करणाऱ्या आणि आता बढती मिळालेल्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवन येथे झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र देण्यात आले.

बालाकोट एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग विमानातून प्रतिहल्ला करुन पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले. याआधी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या तुकडीवर आत्मघाती हल्ला केला. यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बालाकोट येथील तळावर हवाई हल्ला केला. या एअर स्ट्राईकमध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. 

मेजर विभूति शंकर ढौंडियाल यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांविरोधात एक यशस्वी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पाच दहशतवादी ठार झाले आणि २०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. मोहीम सुरू असताना मेजर विभूति शंकर ढौंडियाल हुतात्मा झाले. त्यांच्या पराक्रमाची दखल घेण्यात आली. मेजर ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आले. राष्ट्रपतींनी मेजर ढौंडियाल यांच्या पत्नी लेफ्टनंट नितिका कौल आणि आई सरोज ढौंडियाल यांच्या हाती शौर्य चक्र दिले. 

जम्मू काश्मीर येथे एका मोहिमेत A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार मारणाऱ्या नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. कोर ऑफ इंजीनियर्सचे सपर प्रकाश जाधव यांना एका मोहिमेत दहशतवाद्यांची कोंडी करण्यासाठी मरणोत्तर किर्ती चक्र प्रदान करण्यात आले.

लष्कराच्या पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट अनिल चौहान (सेवानिवृत्त), इंजिनियर इन चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह, नौदलाच्या दक्षिण विभागाचे कमांडर व्हाइस अॅडमिरल अनिल चावला या सर्वांना परम विशिष्ट सेवा मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले. हवाई दलाच्या पूर्व विभागाचे कमांडर एअर मार्शल दिलीप पटनायक यांना अती विशिष्ट सेवा मेडल देण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी