VIDEO: चालत्या बसमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन, आरोपी अटकेत

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 05, 2020 | 16:41 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Woman molested in Bus: चालत्या बसमध्ये एका महिलेची छेड काढन अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने आरडाओरड करताच बसमधील प्रवाशांनी आरोपीला पकडन पोलिसांकडे दिले.

woman molested private bus man arrested kolkata crime news marathi google
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग 
  • पीडित महिला कामावर जात असताना घडला प्रकार 
  • अश्लील वर्तन झाल्याने पीडित महिलेने बसमध्ये केला आरडाओरड
  • बसमधील सहप्रवाशांनी आरोपीला पकडलं 
  • पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन केली अटक

कोलकाता: २८ वर्षीय महिला शनिवारी कामावर जाण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडली. कामावर जाण्यासाठी पीडित महिलेने बस पकडली. मात्र, याच बसमध्ये एका प्रवाशाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बसमधील सहप्रवाशांनी पीडित महिलेच्या मदतीला धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांकडे दिलं.

कोलकातामधील पार्क स्ट्रीट परिसरात शनिवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पार्क स्ट्रीट येथे बसमधून खाली उतरत असताना आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. 

आरोपीने अस्लील वर्तन केल्याने घाबरलेल्या पीडित महिलेने आरडाओरड करुन सर्वांना बोलावले. त्यानंतर तेथे उपस्थित नागरिक महिलेच्या मदतीसाठी पुढे आले. बसमधील सहप्रवाशांनी आरोपीला पकडलं मात्र, त्याच दरम्याने आरोपीने त्यांच्या तावडीतून सटकून पळ काढला. पण लगेचच त्याला पकडण्यात आलं. आरोपी हा हुगली जिल्हयातील निवासी असल्याचं बोललं जात आहे.

तेथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी आरोपीला पकडून पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात आणलं. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक देखील केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

बेस्ट बसमध्ये महिलेसोबत अश्लील वर्तन 

काही दिवसांपूर्वी मुंबईतही एका महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. आरोपी तरुणाने चालत्या बसमध्ये आपल्या पँटची चेन खोलून बसमधील महिला प्रवाशासोबत अस्लील कृत्य केलं होतं. आपल्या मागे उभा असलेला प्रवासी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने मागे वळून पाहिलं. यावेळी आरोपीच्या पँटची चेन उघडी असल्याचं पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी