पोलिसांकडून न्याय मिळावा म्हणून महिलेचं आंदोलन, नग्नावस्थेत उतरली रस्त्यावर

लोकल ते ग्लोबल
Updated May 13, 2019 | 18:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कितीही कडक कायदे असले तरी महिलांवरील अत्याचार काही थांबतांना दिसत नाहीयेत. एकीकडे राजस्थानच्या अलवर इथलं सामूहिक बलात्काराचं प्रकरण ताजं असतांनाच पुन्हा एकदा एका महिलेची कैफियत समोर आलीय.

woman naked on road harassed by in laws Rajasthan
न्यायासाठी महिलेनं नग्नावस्थेत गाठलं पोलीस स्टेशन  |  फोटो सौजन्य: Times Now

जयपूर: देशभरात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसतेय. गेल्या महिन्यात घडलेली अलवर येथील सामूहिक बलात्काराची घटना अजूनही अंगाचा थरकाप उडवतेय. त्यातच आता एका दुसऱ्या घटनेनं समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. राजस्थानमध्ये शनिवारी अशीच एक घटना घडली, की त्यामुळे महिला सुरक्षेच्या कायद्याचा काही उपयोग आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याला न्याय मिळावा यासाठी पीडित महिलेनं चक्क नग्नावस्थेत पोलीस स्टेशन गाठलं.

टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, चुरू जिल्ह्यातील विदेसर शहरात राहणाऱ्या एका विवाहितेचा पती आसाम राज्यात नोकरी करतो. महिलेचा सासरी इतका छळ होतो की ती न्यायासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर उतरली. पीडित महिला शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनकडे जाण्यासाठी आपल्या घरून निघाली. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. महिलेनं सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. एव्हढंच नव्हे तर तिच्या शरीरावरचे कपडे फाडल्याचा आरोपही पीडित महिलेनं सासरच्या लोकांवर केलाय.

 

स्थानिक पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा एसएचओनं चादरीनं महिलेचं शरीर झाकलं. तिथं भर रस्त्यातच महिलेची तक्रार ऐकली गेली आणि त्यानंतर सासरच्या लोकांविरोधात एफआयआर दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या सासरच्या चार जणांना अटक केली असून पीडित महिलेला नारी निकेतनमध्ये पाठवण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही महाराष्ट्रातील आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि देशातील इतरही राज्यांतून गरीब महिलांना राजस्थानात लग्नासाठी आणलं जातं. त्यातीलच ही एक आहे. ज्या पद्धतीनं महिलेसोबत गैरवर्तन केलं गेलं आहे. त्यानुसार तिचा किती छळ झाला असेल हे आपण समजू शकतो. वरील व्हिडिओतूनही आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे ही महिला नग्नावस्थेत शहरात रस्त्याच्या मधोमध चालत होती.

दरम्यान, राजस्थानमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहे. मात्र, मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट याबाबतीत मूक गिळून गप्प बसले आहेत. मागील महिन्यात अलवर जिल्ह्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. २६ एप्रिलला एका विवाहित महिलेवर तिच्या पतीसमोरच ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. एव्हढंच नव्हे तर आरोपींनी महिलेचा व्हिडिओ बनवत तो सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला. अशा या धक्कादायक घटनेनंतरही सरकारकडून कुठलंही गंभीर पाऊल उचललं गेलं नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी