[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 20, 2019 | 14:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एका महिलेला बेदम मारहाण करुन निर्वस्त्र करत संपूर्ण गावात तिला फिरवल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. ही महिला २०११मध्ये आपल्या प्रियकरासोबत गाव सोडून गेली होती. 

woman naked thrashed villagers west bengal
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं 

कोलकाता: पश्चिम बंगालमधील एका गावातील संतप्त नागरिकांनी महिलेला बेदम मारहाण करत निर्वस्त्र केल्याचा प्रकार घडला आहे. गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपानंतर कथित रुपात तिला ग्रामस्थांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथे घडली आहे. महिलेला मारहाण होतानाची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीडित महिला २०११ पर्यंत गावातच राहत होती. त्यानंतर कथित रुपात गावातीलच एका व्यक्तीसोबत गाव सोडून गेली आणि नंतर त्या व्यक्तीसोबतच राहू लागली. त्यानंतर आता ही महिला पुन्हा गावात परतली. यावेळी घरातील सदस्य आपल्याला स्वीकारतील असं महिलेला वाटलं होतं मात्र, तिला दोषी ठरवत बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर या महिलेला निर्वस्त्र करत संपूर्ण गावात फिरवलं. 

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही ग्रामस्त पीडित महिलेला मारहाण करताना दिसत आहे. तसेच ज्या नागरिकांनी मध्यस्थी करत सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही ग्रामस्थांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ग्रामस्थांनी या महिलेला नग्न केलं आणि गावात फिरवलं. 

ग्रामस्थांना संशय होता की, ही महिला पुन्हा गावातील एखाद्या पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवेल त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तिला मारहाण केल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर पीडित महिलेवर प्राथमिक उपचार केले असून आता तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल केलेली नाहीये त्यामुळे कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी