झाकीर नाईकचे वादग्रस्त वक्तव्य, 'पैगंबरांवर टीका करणाऱ्या भारतीयांना मुस्लिम देशांनी जेलमध्ये टाकावे'

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 23, 2020 | 16:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

मलेशियात राहणारे वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक यांनी गैरमुस्लिम भारतीयांविरोधात भडकाऊ वक्तव्य केले आहे. त्यांनी मुस्लिम देशांना आवाहन केले आहे की, पैगंबराची बदनामी करणाऱ्या भारतीयांना जेलमध्ये टाकावे.

Zakir Naik
जाकिर नाईक यांनी ओकले विष, पैगंबरांवर टीका करणाऱ्या भारतीयांना मुस्लिम देशांनी जेलमध्ये टाकावे 

थोडं पण कामाचं

  • फरार मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक यांनी परत केले वादग्रस्त वक्तव्य
  • नाईक म्हणाले- पैगंबरावर टीका करणाऱ्या गैरमुस्लिमांना जेलमध्ये टाकले जावे
  • त्यांनी म्हटले की, पैगंबरावर टीका करणारे बहुतेक लोक भाजपाचे भक्त आहेत

क्वालालंपूर: भारतात (India) द्वेषपूर्ण वक्तव्ये (hateful speech) केल्याच्या आरोपांचा सामना करणारे फरार मुस्लिम धर्मगुरू (absconding Islamist priest) झाकीर नाईक (Zakir Naik) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी मुस्लिम देशांना (Muslim nations) आवाहन (appeal) केले आहे की पैगंबराची बदनामी (criticizing prophet Mohammad) करणाऱ्या भारतीयांना (Indians) जेलमध्ये (put behind bars) टाकावे. त्यांनी असेही म्हटले आहे की, पैगंबरावर टीका करणारे बहुतेक लोक भाजपाचे भक्त (followers of BJP) आहेत.

जगभरातील मुस्लिम देशांना केले आवाहन

झाकीर नाईक यांनी सौदी अरेबिया, इंडोनेशियासह मुस्लिम देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा भारतीयांचा एक डेटाबेस तयार करावा जेणेकरून ते जेव्हा इस्लामी देशांमध्ये येतील तेव्हा त्यांना अटक केली जाऊ शकेल. त्यांनी म्हटले की, या देशांनी गैरमुस्लिम भारतीयांच्या सर्व टिप्पण्या आणि वाईट वक्तव्यांचा एक डेटाबेस तयार करावा आणि तो कंप्यूटरमध्ये सेव्ह करून ठेवावा.

‘या लोकांना आल्या आल्या अटक करा’

झाकीर नाईक म्हणाले, ‘पुढच्या वेळी जेव्हा हे लोक कुवैत, सौदी अरेबिया, इंडोनेशिया अशा देशांमध्ये येतील तेव्हा त्यांची चौकशी करा आणि त्यांनी इस्लाम किंवा पैगंबरांबद्दल काही अपमानजनक टिप्पणी केली आहे का याचा तपास करा. जर त्यांनी असे केले असेल तर त्यांच्यावर खटला नोंदवून त्यांना जेलमध्ये टाका. आपल्याकडे अशाप्रकारचे एक डेटाबेस असल्याचे जाहीर करा आणि त्यातील नावे मात्र गुप्त ठेवा. हे लोक येताच त्यांना अटक करा.’

सध्या मलेशिया येथे राहणाऱ्या नाईक यांनी म्हटले की, अशा लोकांविरोधात खटला चालवून त्यांना जेलमध्ये टाकले जावे. ते म्हणाले, ‘माझ्यावर विश्वास ठेवा, असे बहुतेक लोक भाजपाचे भक्त आहेत आणि इस्लाम आणि मुस्लिमांविरोधात विष पसरवत आहेत.’ सध्या झाकीर नाईक हे घोषित फरार आहेत आणि त्यांच्यावर सांप्रदायिक भावना भडकवल्याचा आणि भारतात बेकायदेशीर गोष्टी केल्याचा आरोप आहे.

पैशांची अफरातफर आणि द्वेष पसरवण्याचा आरोप

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर नाईक याच्या हस्तांतरणासाठी सरकार मलेशिया सरकारशी बोलत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) झाकीर नाईक यांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. पण तपास चालू होण्यापूर्वीच झाकीर नाईक हे भारतातून पळून गेले. यानंतर ते मलेशियात राहात आहेत. त्यांच्यावर पैशांची अफरातफर आणि द्वेष पसरवण्याचा आरोप आहे.

नाईक यांचे नाव २०१६मध्ये ढाका येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्येही आले होते. या स्फोटांमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला होता. या कटात सामील असलेल्या एका आरोपीने कबूल केले होते की नाईक यांच्या भाषणामुळे त्याने हे घृणास्पद कार्य केले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक गेल्या तीन वर्षांपासून मलेशियात राहात आहेत. भारतात त्यांची भाषणे पीस टीव्हीवर प्रसारित होतात ज्यांवर आता प्रतिबंध लावण्यात आला आहे.

मलेशियाने नाईकला दिले कायमस्वरूपी नागरिकत्व

ब्रिटन आणि कॅनडा या देशांनी नाईक यांना व्हीजा देण्यास नकार दिला ज्यानंतर मलेशियाने त्यांना कायमस्वरूपी नागरिकत्व दिले. त्यांच्या इस्लामिक रीसर्च फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने २०११ साली मुंबईत शांतता परिषद आयोजित केली होती. एनआयएने म्हटले आहे की नाईक यांच्यावर लोकांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि हिंसा पसरवण्याचेही आरोप आहेत. पण नाईक यांनी मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी