Ganesh Chaturthi 2023: देशातील या 9 शहरांमध्ये जल्लोषात साजरा केला जातो गणेशोत्सव

Ganesh Chaturthi 2023: हिंदू कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यात चतुर्दशीला बुद्धीचे दैवत गणेश यांचा वाढदिवस देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केलं जातो. दहा दिवस चालणारा हा उत्सव भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो.

Updated Sep 18, 2023 | 02:24 PM IST

9 places in india to celebrated ganeshotsav with joy

गणेशोत्सव 2023

Famous Places for Ganesh Festival: देशभरात साजरा केला जाणारा हा 10दिवसीय उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीपासून केली होते, तर अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन करून सणाची सांगता करण्यात येते. हा सण प्रामुख्याने सामुदायिक उत्सवांसाठी घरांघरात आणि सार्वजनिक मंडळात गणेशमूर्तींची स्थापना करून साजरा केला जातो.
यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया असे म्हणत बाप्पाचे आगमन होते, आणि दहाव्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पूढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत जड अंतःकरणाने लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाते. हे दहा दिवस गणेश भक्तांसाठी विलक्षण असतात. भारतातील अनेक शहरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहण्याजोगे असतो, जाणून घेऊ 9 प्रमुख शहरांबद्दल

मुंबईगणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील, विशेषत: मुंबईतील बहुप्रतिक्षित सण आहे. मुंबईत अनेक मनाचे गणपती बसवले जातात. ज्यामध्ये परळमधील लालबागचा राजा ही राजातील सर्वात प्रतिष्ठित मूर्तींपैकी एक आहे, येथे बाप्पाच्या मुखदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भक्तगण गर्दी करतात.
इतकेच नव्हे तर मुंबईतील दक्षिण आणि उपनगरीय विभागातील इतर भागातही मोठमोठे गणेशमूर्ती आणली जाते, सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे सामाजिक समस्यांचे थीमॅटिक प्रतिनिधित्व असलेले पँडल यादरम्यान उभारले जातात. ज्यामुळे उत्सवाची रंगत आणखी वाढते. या सणाला मिठाईची दुकाने, हॉटेल्स व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात फायद्यात असतात.

गोवा

गणेश चतुर्थी हा गोव्यातील सर्वात मोठा सण आहे, गोव्यातील बहुतांश कोंकणी बहुल घरांमध्ये, गणपतीची प्रतिष्ठापना करण्याआधी फुले, हंगामी भाज्या आणि फळांनी माटोळी (लाकडी छत) सजवली जाते. आणि त्यानंतर मातीच्या गणेशमूर्तीची औपचारिक स्थापना केली जाते.
पंजीम आणि क्यूपेम या सारख्या गोव्यातील कैक ठिकाणी, स्थानिक मंडळे सामुदायिक उत्सव किंवा सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करतात.

पुणे

पेशवाईच्या काळात 1892 मध्ये, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि विश्व भासवडेकर यांसारख्या क्रांतिकारकांनी पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला, त्यानंतर पुण्यात देखील मुंबईसारखे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली, त्याअंतर्गत आज अनेक मोठमोठी मंडळ आपल्या ठिकाणी गणेशमूर्त्या आणतात. संपूर्ण पुण्यात सामुदायिक उत्सव आयोजित केले जातात.
तुळशीबाग येथील सर्वात मोठी गणपतीची मूर्ती, 15 फूट उभी आहे, तसेच दगडूशेठ गणपती मंदिर हे एक पुण्यातील लोकप्रिय ठिकाण आहे. तसेच कसबा गणपती मंदिर ही पुणे शहरातील प्रमुख देवता आहे ज्याला ग्रामदैवत असेही संबोधले जाते.

नागपूर

नागपुर येथे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे विदर्भ माथाडी कामगार गणेश उत्सवाची 31 फूट उंच मूर्ती. दररोज संध्याकाळी येथे सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. फुटाळा तलाव परिसर विसर्जनाच्या दिवशी लोकांनी फुलून जातो कारण हजारो भाविक त्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र येतात. श्री गणेश मंदिर टेकडी नागपूर हे आणखी एक ठिकाण आहे जे सकाळच्या आरतीसाठी लोकांना आकर्षित करते.

मंगळुरु

कर्नाटकातील गणेश चतुर्थी हा सण इतर प्रदेशांपेक्षा वेगळा असतो, कारण हा सण स्वर्ण गौरी व्रतम किंवा गौरी हब्बा यांच्या आधी येतो. त्यामुळे चतुर्थीला गणेश गौरी सण असेही म्हणतात.

बेंगळुरू

विनायक चतुर्थीला घराव्यतिरिक्त विविध भागात भव्य उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या 10 दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.

हैदराबाद

खैराताबादचा गणेश हा हैदराबादमधील सुप्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे दरवर्षी सर्वात उंच गणेश मूर्ती (अंदाजे 50 फूट) ठेवली जाते, या शहरातील लोक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

सुरत

सुरतमध्ये देखील गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी जय्यत तयारी होते. असे मानले जाते की 1942 मध्ये गोपीपुरा येथील हिंदू मिलन मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून ही परंपरा सुरतच्या रहिवाशांमध्ये सुरू आहे. सुरत गणेश उत्सव समितीद्वारे सामान्यत: गणेश आगमन यात्रा आयोजित केली जाते आणि समृद्धीची देवता गणेशाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक जमतात. सुरतमधील विविध भागात जवळपास 50,000 मूर्ती स्थापित केल्या आहेत आणि लोक उत्सवात सक्रिय सहभाग घेतात. साधारणपणे 9 फूट मातीच्या मूर्ती बहुतेक मंडळांमध्ये दिसतात.
ताज्या बातम्या

धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

मंगळवारी या राशींवर बजरंगबलीची असेल विशेष कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Vivah Muhurat 2023: नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांमधील लग्नासाठी शुभ मुहूर्त

Vivah Muhurat 2023 -

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Desi Jugaad       8

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Vivo X90 Pro  Vivo    iPhone

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Sky Force Teaser

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Virushka second baby news

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच

Ghee Side Effects
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited