Breaking News : मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, लोकसभेत मांडले जाऊ शकते?

Woman Reservation Bill : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळाने 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक लोकसभेत मांडले जाऊ शकते.

Updated Sep 19, 2023 | 12:19 AM IST

narendra modi

narendra modi

Woman Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. यासंबंधीचे विधेयक विशेष अधिवेशनात लोकसभेत मांडले जाऊ शकते. आज संध्याकाळी संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. महिला आरक्षण विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती.
दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनात होणाऱ्या विशेष सत्रादरम्यान हे विधेयक लोकसभेत मांडले जाऊ शकते.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात माहिती दिली आहे. महिला आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचे नैतिक धैर्य फक्त मोदी सरकारमध्ये आहे, हे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सिद्ध झाले, असे ट्विट त्यांनी केले. त्यांनी लिहिले, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचे अभिनंदन.

काँग्रेसने केले स्वागत

महिला आरक्षण विधेयकाबाबत मोदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, काँग्रेस पक्ष दीर्घ काळापासून महिला आरक्षण लागू करण्याची मागणी करत आहे. आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि विधेयकाच्या तपशीलाची वाट पाहत आहोत. विशेष अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीत यावर सखोल चर्चा होऊ शकली असती आणि पडद्यामागच्या राजकारणाऐवजी एकमत होऊ शकले असते.
ताज्या बातम्या

Pitru Paksha 2023: शुक्रवारपासून सुरु होत आहे पितृपक्ष, जाणून घ्या कोण करू शकतो श्राद्ध

Pitru Paksha 2023

Pune Ganpati Visarjan 2023: पुण्यात थाटामाटत गणपती विसर्जनाची तयारी! आज बंद राहाणार शहरातले हे रस्ते

Pune Ganpati Visarjan 2023

Sneke Venom: जीवघेण्या सापाचं विष या गंभीर आजारावर ठरतं रामबाण

Sneke Venom

Ranbir Kapoor Birthday: रणबीर कपूर लव्ह लाईफमुळे नेहमीचं चर्चेत, आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केलंय डेट

Ranbir Kapoor Birthday

24 ऑक्टोबरनंतर या फोनवर WhatsApp चालणार नाही, जाणून घ्या नवीन अपडेट्स

24    WhatsApp

Daily Horoscope 28 September 2023 : अनंत चतुर्दशीला या राशींचे उजळणार भाग्य, वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 28 September 2023         12

Ganesh Visarjan 2023: या शुभ वेळेत करा लाडक्या गणरायाचे विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

Ganesh Visarjan 2023

Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi : महात्मा गांधी जयंतीला असं करा प्रभावी भाषण

Mahatma Gandhi Jayanti 2023 Speech In Marathi
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited