Kiren Rijiju : किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवले

Reshuffle in Modi Cabinet : कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांच्या खात्यात बदल करण्यात आला. किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवले. किरेन रिजीजू पृथ्वी विज्ञान ( Ministry of Earth Sciences) या खात्याचे मंत्री म्हणून काम करतील.

Updated May 18, 2023 | 11:03 AM IST

cabinet reshuffle, arjun ram meghwal replaces kiren rijiju as law minister

cabinet reshuffle, arjun ram meghwal replaces kiren rijiju as law minister

Reshuffle in Modi Cabinet : कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू यांच्या खात्यात बदल करण्यात आला. किरेन रिजीजू यांना कायदा मंत्री पदावरून हटवले. आता किरेन रिजीजू पृथ्वी विज्ञान ( Ministry of Earth Sciences) या खात्याचे मंत्री म्हणून काम करतील. भाजपच्या अर्जुन राम मेघवाल यांची भारताचे नवे कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.

अर्जुन राम मेघवाल हे राजस्थानमधून निवडून आलेले भाजपचे खासदार आहेत. ते मोदी सरकारमध्ये स्वतंत्र कार्यभार हाताळणारे राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक विभाग ही खाती त्यांच्याकडे होती. आता अर्जुन राम मेघवाल हे भारताचे कायदा मंत्री म्हणून काम करणार आहेत. मोदी मंत्रिमंडळात झालेले हे दोन मोठे बदल आहेत.
राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी म्हणून अर्जुन राम मेघवाल यांनी आधी काम केले आहे. पुढे राजकारणात आल्यानंतर ते मागासवर्गियांचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागले. आता अर्जुन राम मेघवाल यांची कायदा मंत्रिपदी झालेली नियुक्ती ही राजस्थानची विधानसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited