मोदींना हरवायचे असेल तर विरोधकांनी एकत्र यायला हवे- काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावरून कॉंग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवण्यास सुरुवात केली असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल मोठे विधान केले आहे. काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचे आवाहन विरोधकांना केले.

Updated May 18, 2023 | 08:56 AM IST

Congress leader Acharya Pramod Krishnam

Congress leader Pramod Krishnam said If we want to defeat PM Modi opposition should unite

फोटो साभार : IANSHINDI
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावरून कॉंग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवण्यास सुरुवात केली असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल मोठे विधान केले आहे. काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचे आवाहन विरोधकांना केले. त्यांनी प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदींचे कौतुक केले.नरेंद्र मोदी हा आजचा सर्वात मोठा चेहरा असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदींची प्रतिमा लार्जर दॅन लाइफ झाली आहे. त्यामुळे मोदींचा पराभव करायचा असेल तर विरोधकांना मोठा चेहरा आणावा लागेल, असे वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केले आहे. (Congress leader Pramod Krishnam said If we want to defeat PM Modi opposition should unite )

विरोधकांनी एकमत व्हायला हवे

'2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर प्रियांका गांधी वाड्रा यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्यावर विरोधकांना एकमत करावे लागेल, विरोधकांनी प्रियंका गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करावे. मोदींना पराभूत करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आता वेळ आली आहे की प्रियांका गांधी यांच्या नावावर विरोधकांनी एकमत व्हायला हवे', असे प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार

दरम्सयान, माजवादी पार्टी (SP) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. सपाच्या भूमिकेत हा एक मोठा बदल आहे कारण आतापर्यंत पक्ष काँग्रेसला भाजपची बी-टीम म्हणून विरोध करत होता. मात्र आता अखिलेश यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील विरोधी ऐक्याच्या विधानाचे समर्थन केले असून, राज्यात जो पक्ष ताकदवान असेल त्याने तेथे निवडणूक लढवावी असे म्हटले आहे.

जनतेचा कल कुणाकडे

आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या या आवाहनाला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मी राहुल गांधींना ओळखतो, पण प्रियंका गांधींबद्दल मला काहीच माहिती नाही, काँग्रेसने प्रियंका गांधींना पंतप्रधानपदाची उमेदवार बनवण्याचे वक्तव्य बेजबाबदार असून या विधानामुळे गोंधळच वाढेल, असे म्हणून रॉय यांनी आचार्य कृष्णम यांना उत्तर दिले आहे. मात्र जनतेचा कल कुणाकडे आहे हे तर येणाऱ्या काळातच कळेल.

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited