India Canada Tension: भारत-कॅनडामधील तणाव वाढला, कॅनडियन अधिकाऱ्याची भारतातून हकालपट्टी

India-Canada Relations: कॅनडाने सोमवारी एका उच्चपदस्थ भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. कॅनडामधील शीख कार्यकर्त्याच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असू शकतो हे आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी विश्वसनीय मानले आहेत. प्रत्युत्तरादाखल भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्ताला बोलावून एका वरिष्ठ मुत्सद्दीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या राजनैतिकाला भारत सोडण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Updated Sep 19, 2023 | 12:07 PM IST

India Canada Tension: भारत-कॅनडामधील तणाव वाढला, कॅनडियन अधिकाऱ्याची भारतातून हकालपट्टी
Justin Trudeaus Allegations: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो असा आरोप केला आहे. तसेच भारत सरकार निज्जरच्या हत्येचे आरोप फेटाळत आहे, असा आरोप देखील ट्रूडो यांनी केला आहे. या आरोपानंतर निज्जरच्या हत्येतील भारताच्या भूमिकेचा तपास करत कॅनडाने भारताच्या सर्वोच्च मुत्सद्याची हकालपट्टी केली आहे. प्रत्युत्तरादाखल भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्ताला बोलावून एका वरिष्ठ मुत्सद्दीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या राजनैतिकाला भारत सोडण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कॅनडाने सोमवारी एका उच्चपदस्थ भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. कॅनडामधील शीख कार्यकर्त्याच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असू शकतो हे आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी विश्वसनीय मानले आहेत. ते संसदेत बोलताना म्हणाले की, खलिस्तानचा कट्टर समर्थक शीख नेता हरदीपसिंग निज्जर यांची 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील शीख सांस्कृतिक केंद्राबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडाच्या गुप्तचर संस्था या आरोपांची चौकशी करत आहेत. कॅनडातील शीख कार्यकर्त्याच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध असू शकतो असे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले.

भारताने फेटाळून लावले कॅनडाचे आरोप

भारताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे हे आरोप 'तथ्यहीन' आणि 'निराधार' असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारताचा सहभाग असल्याचा आरोप 'मूर्खपणा' आहे. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आमच्या पंतप्रधानांसोबत केलेल्या संभाषणात केले होते, जे पूर्णपणे फेटाळले गेले होते."
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "भारत हा कायद्याच्या राज्यासाठी वचनबद्ध असलेला लोकशाही देश आहे. असे 'निराधार' आरोप खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेक्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना 'कॅनडामध्ये अभय दिले गेले आहे. त्यांच्यापासून भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका आहे. कॅनडा सरकारची या प्रकरणी निष्क्रीयता ही दीर्घकाळापासून चिंतेची बाब आहे."

अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली?

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणावाचे कारण बनला आहे. यावर अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसने एका निवेदनात 'कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानी नेत्याच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याच्या आरोपाबद्दल अमेरिका 'खूप चिंतित' आहे.' असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अॅड्रिन वॉटसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की "आम्ही पंतप्रधान ट्रुडो यांनी आज संदर्भित केलेल्या आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत. आम्ही आमच्या कॅनेडियन भागीदारांशी नियमित संपर्कात आहोत. कॅनडाचा तपास पुढे सरकणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे आहे."
ताज्या बातम्या

Lalbaug cha Raja 2023 Darshan: पुण्याहून दर्शनासाठी आले तीन 'गोल्ड मॅन', बाप्पाहून जास्त सोने गळ्यात!

Lalbaug cha Raja 2023 Darshan

सिध्दीविनायक मंदिर, खेतवाडीचा राजासह अनेक मंडळांमध्ये पेटीएमची डिजिटल दान सुविधा

EPF खातेधारकांना अर्थ मंत्रालयाकडून दिलासा, पैसे काढण्यात येणार नाही अडचण

EPF

Diabetes Remedy: मधुमेहासह कोलेस्ट्रॉलच्या समस्येत रामबाण ठरतो हा मसाल्याचा पदार्थ

Diabetes Remedy

Weight Gain Superfoods : वजन वाढवण्यासाठी आहारात करा या 5 सुपरफूडचा समावेश

Weight Gain Superfoods       5

रश्मिका मंदान्नाचा Animal मधील फर्स्ट लूक रिलीज, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, साडीत दिसतेयं सुंदर

  Animal

Maharastra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Maharastra Rain Update

नवरोबाची तक्रार टाळायची असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा आणि वेळ वाचवा

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited