ट्रेंडिंग:
Latest Marathi News LIVE: संसदेत नारी शक्ती वंदन कायदा विधेयक सादर; लोकसभा, विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षणाचा प्रस्ताव
Updated Sep 19, 2023 | 05:58 PM IST

Latest Marathi News LIVE: संसदेत नारी शक्ती वंदन कायदा विधेयक सादर; लोकसभा, विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षणाचा प्रस्ताव
वपोनि राजेंद्र काणे यांच्या घरी पोलिसांच्या गणवेशात पोलीस बाप्पाचे आगमन
असाच एक गणपती बाप्पा मुंबईच्या अंधेरी परिसरात अवतरला आहे, ज्यांचे चाहते फक्त सामान्य मुंबईकरच नाहीत तर बॉलिवूडचे बडे सुपरस्टारही आहेत. गेल्या 6 वर्षांपासून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी पोलिसांच्या गणवेशात पोलीस बाप्पाचे आगमन होत असून त्यांचे संपूर्ण कुटुंबच नव्हे तर बॉलिवूडमधील बडे स्टार्सही पोलिस बाप्पाची पूजा करतात. समाजाला चांगला संदेश देण्यासाठी पोलीस बाप्पा दरवर्षी पोलीस गणवेशात येतात, यंदा पोलीस बाप्पा ‘नो ड्रग्ज’चा संदेश देत आहेत. पोलिसांच्या गणवेशातील बाप्पा आणि सभोवतालची सजावटही पोलिसांशी संबंधित आहे, इतकंच नाही तर यावर्षी पोलीस बाप्पावर एक हिंदी गाणंही बनवण्यात आलं आहे ज्यामध्ये अनिल कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी काम केलं आहे.वपोनि राजेंद्र काणे यांच्या घरी पोलिसांच्या गणवेशात पोलीस बाप्पाचे आगमन पाहा व्हिडिओ
Parliament Session: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर
- लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आलं आहे.
- कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सादर केलं.
- महिला आरक्षण विधेयकाचा कालावधी 15 वर्षांचा असेल.
- 15 वर्षांनंतर संसद त्यावर पुनर्विचार करणार असल्याची माहिती कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
- या विधेयकाअंतर्गत लोकसभेत महिलांसाठी 181 जागा आरक्षित असतील.
PM Modi: खासदारांचा व्यवहारच ठरवेल कोण संसदेत बसणार : पंतप्रधान
संसदेतील सर्व खासदारांचा व्यवहार योग्य असायला पाहिजे. खासदारांच्या व्यवहारावरुन कळेल कोण संसदेत बसणार आणि कोण विरोधात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आज जुन्या संसद भवनाचा निरोप घेत खासदारांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांच्या पंढरी घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना
- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्नीक केली परळी येथील घरी श्री ची प्रतिष्ठापना!
- महराष्ट्रातील दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने यंदा सध्या पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना!
- परळी येथील जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली श्री ची प्रतिष्ठापना!
Parliament Special Session: आज जुन्या संसद भवनाचा निरोप घेत खासदारांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला
आज जुन्या संसद भवनाचा निरोप घेत खासदारांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्याआधी जुन्या संसद भवनात खासदारांचे फोटो सेशन झाले. या फोटोशूटदरम्यान सर्व खासदारांना एकत्र उभे करण्यात आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी मागे उभे होते, तर अनेक खासदार खाली जमीनीवर बसलेले दिसले.Parliament Special Session: जुन्या संसद भवनात खासदारांचे फोटो सेशन
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi, Rajya Sabha Chairman and Vice President Jagdeep Dhankhar, Lok Sabha Speaker Om Birla and other Parliamentarians gather for the joint photo session ahead of today's Parliament Session. pic.twitter.com/burhE7OGX1
— ANI (@ANI) September 19, 2023
Pune Ganapati: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरूवात
- गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली.
- पंरपरेप्रमाणे, आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे.
- कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना होत आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुला करण्यात येईल.
पुण्यात गणेश उत्सवाला सुरूवात, वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक
पुण्यात गणेश उत्सवाला सुरूवात, वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक#Pune #punenews #GaneshChaturthi2023 #GaneshFestival pic.twitter.com/Bqd10CyV2q
— Times Now Marathi (@timesnowmarathi) September 19, 2023
Parliament Special Session: खासदार संख्या 33 टक्क्यांनी वाढणार, नव्या संसदेत होणार मोठा निर्णय?
देशाच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेतील जागा 33 यांनी वाढवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या लोकसभेत 543 खासदार असून यात 33 टक्के वाढ झाल्यास सुमारे 180 सदस्य वाढू शकतात. त्यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढून 723 ते 725 होऊ शकते. यासोबतच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव देखील संसदेत येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही प्रस्ताव आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबतच पंतप्रधान मोदी आज महिला खासदारांना संबोधित करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 1.15 वाजता लोकसभेचं सत्र सुरू होणार आहे. आजच्या संसदेच्या कामकाजाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.Pune Ganeshotsav 2023: पुण्यात गणेश उत्सवाला सुरूवात, वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक
पुण्यातील गणेश उत्सवाला सुरुवात झालीय. थोड्याच वेळात पाचही मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यााधी सर्व गणेश मंडळांनी बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी गणेश मंडळ समोर शिवकालीन चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाणे पुणे दुमदुमले आहे.Special Parliament Session Live: मनमोहन सिंग शेअर करतील आपला अनुभव
लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या मेनका गांधी आणि राज्यसभेत सर्वाधिक काळ खासदार राहिलेले मनमोहन सिंग आणि दोन्ही सभागृहात सर्वाधिक काळ काम केलेले खासदार शिबुसोरेन हे त्यांच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासातील अनुभव शेअर करणार आहेत. सेंट्रल हॉलच्या या कार्यक्रमात 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा ठरावही घेण्यात मांडण्यात येणार आहे.Special Parliament Session Latest News: नव्या संसद भवनाकडे पायी चालत जातील पंतप्रधान मोदी
जुन्या इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता एक विशेष कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पायी चालत नवीन इमारतीत पोहोचतील. यादरम्यान राज्यघटनाही पंतप्रधानांच्या हातात असेल. सर्व मंत्री, खासदार त्यांच्या मागे चालत जातील. सर्व खासदार नवीन ओळखपत्र घेऊन नवीन इमारतीत प्रवेश करतील. नवीन इमारतीत लोकसभेचे कामकाज दुपारी 1.15 वाजता सुरू होईल, तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.15 वाजता सुरू होईल.Special Parliament Session Updates: जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रम
सेंट्रल हॉलमध्ये जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. संसदीय वारसा आणि संसदीय अभिमानाचा साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनातून आज सर्व खासदार नव्या इमारतीत जाणार असून आजपासूनच संसदेचे विशेष अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे, मात्र त्यापूर्वी जुन्या इमारतीला निरोप दिला जाईल.Special Parliament Session News : आज गणेश चतुर्थीनिमित्त होणार नव्या संसद भवनाचा श्रीगणेशा
स्वतंत्र भारताच्या लोकशाहीचे प्रतीक असलेली जुनी संसद भवन आज इतिहासजमा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून नवीन संसद भवनाचा श्री गणेश होईल. त्यानंतर संसदेचे कामकाज नवीन इमारतीच्या सभागृहातून सुरू होईल.कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी विशेष ट्रेन
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी एक विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल ट्रेनचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात जाणाऱ्यांसाठी होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून 23 सप्टेंबर रोजी एक विशेष गाडी सोडली जाणार आहे. या स्पेशल ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळू शकतो.
00:41
मुंबईत विमानतळावर खासगी विमानाचा अपघात

00:50
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

00:34
अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक

00:41
कर्जत मतदार संघात लक्ष घाला, माजी आमदार पाटी लावण्याची वेळ पडणार नाही..

02:35
Ashok Saraf: लिटील चॅम्प्सचे प्रेम बघून अशोक मामांना अश्रू अनावर
© 2023 Bennett, Coleman & Company Limited