ट्रेंडिंग:

Live Updates

Latest Marathi News LIVE: सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत फैसला

Latest Maharashtra News Today Live: सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेशही दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या बातमीसह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय घडमोडी, त्याचबरोबर आरोग्य, लाईफस्टाईल, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Times Now Marathi

Updated Sep 20, 2023 | 07:45 PM IST

Latest Marathi News LIVE: सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत फैसला

Latest Marathi News LIVE: सुप्रीम कोर्टात या तारखेला होणार शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत फैसला

Sep 20, 2023 | 07:45 PM IST

New Vande Bharat : पंतप्रधान मोदी 24 सप्टेंबर रोजी नऊ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्स व्हर्चुअली करणार लाँच

New Vande Bharat    24
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेश या निवडणुकीसाठी तयार असलेल्या राज्यांसह विविध गंतव्यस्थानांसाठी एकाच दिवसात नऊ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.७ जुलै रोजी गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेस आणि जोधपूर-साबरमती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत.
Sep 20, 2023 | 07:22 PM IST

संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील हे 'दादा' लक्ष्य

आरक्षणाचा विषयच निघाला आहे, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे. त्यावरही सभागृहात चर्चा झाल्यास आम्हाला चर्चेत सहभाग घ्यायला आनंदच होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, महिला आरक्षणावरुन भाजप नेते महिला सक्षमीकरणावर बोलत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुखांनीच मला व्यक्तिगत लक्ष्य करत घरी जाऊन जेवण बनवा असे म्हटल्याची आठवणी सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितली.संसदेत एका खासदाराला उद्देशून बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, व्हाय कान्ट वुमेन, भाई भी कर सकता है. मात्र, प्रत्येक घरात असा भाऊ नसतो, जो बहिणीचं सगळं चांगलं कल्याण होऊ इच्छितो. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेत अजित पवारांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळे विशेष अधिवेशनात गेल्या २ दिवसांपासून भाजप आणि सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यासोबतच, अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावरही निशाणा साधत आहेत.
Sep 20, 2023 | 02:22 PM IST

काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन, सोनिया गांधींची लोकसभेत माहिती

आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. सर्वप्रथम कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) मांडले होते. यावर चर्चेसाठी आज सकाळी 11 ते सायंकाळी 6, अशी 7 तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी लोकसभेत बोलत आहेत. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, "काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. माझ्या आयुष्यातील ही एक मोठी गोष्ट आहे. महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे पहिले विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते."
Sep 20, 2023 | 07:46 AM IST

Shivsena Political Crisis: ३ ऑक्टोबर रोजी ठरणार शिंदे गटाच्या १६ आमदारांचं भवितव्य

सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेशही दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी शिंदे गटाच्या 16 आमदारांचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2023 | 07:46 AM IST

Canada New Travel Advisory For India: कॅनडाने आपल्या नागरिकांना भारतात जाण्याबाबत जारी केली अॅडव्हायजरी

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या प्रकरणात कॅनडाने आपल्या नागरिकांना भारतात जाण्याबाबत एक नवीन ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. न्यू ट्रॅव्हल अॅडव्हायजरी फॉर इंडिया मध्ये कॅनडाने आपल्या नागरिकांना 'सुरक्षेच्या परिस्थितीमुळे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जाणे टाळा. दहशतवाद, अतिरेकी, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे, असे म्हटले आहे. या अॅडव्हायजरीमध्ये लडाखच्या प्रवासाचा समावेश नाही.
Sep 20, 2023 | 07:46 AM IST

PM Justin Trudeau: भारताच्या कारवाईनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो नरमले

भारताच्या झटपट कारवाईनंतर कॅनडाचा दृष्टिकोन आता मवाळ झाला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, "शीख कॅनडा आपल्या एजंट फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी संबंधित असल्याचे सांगून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, भारताने हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळावा अशी आमची इच्छा आहे. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा विषय पुढे नेण्याचा विचार करत नाही आहोत".
Sep 20, 2023 | 07:46 AM IST

Pune Rain and Pune Water Supply : पुणे जिल्ह्यात यंदा फक्त 66 टक्के पाऊस

यंदा जुलै महिन्यानंतर राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतिक्षा आहे. तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात यदेखील यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ 65.7 टक्के एवढाच पाऊस झाला.पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठावरसगाव धरण: 99.55%पानशेत धरण: 100%खडकवासला धरण: 53.12%पवना धरण: 100 %उजनी धरण: 22.06 %कोयना धरण: 82.51%
Sep 20, 2023 | 07:46 AM IST

Mohammed Shami Gets Bail: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला जामीन मंजूर

वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली असताना भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला मोठा दिलासा मिळाला आहे. पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात मंगळवारी अलीपूर कोर्टाने मोहम्मद शामीला जामीन मंजूर केला आहे. मोहम्मद शामीच्या पत्नीनं त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश अलीपूर कोर्टानं मोहम्मद शामीला सुनावणीसाठी दिले होते. त्यानुसार शामी कोर्टात हजर राहिला. त्यानंतर कोर्टानं शामीला जामीन मंजूर केला आहे.

© 2023 Bennett, Coleman & Company Limited