ट्रेंडिंग:

Shocking! वयोवृद्ध महिलेची हत्या करुन चेहरा ओरबाडून खाल्ला, मुंबईतील तरुणाचं धक्कादायक कृत्य

Crime News: एका तरुणाने वृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या चेहऱ्यावरील मांस ओरबडून खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Updated May 28, 2023 | 04:20 PM IST

Shocking! वयोवृद्ध महिलेची हत्या करुन चेहरा ओरबाडून खाल्ला, मुंबईतील तरुणाचं धक्कादायक कृत्य
Mumbai youth killed elderly woman: हत्येची एक विचित्र अशी घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावरील मांस ओरबाडून खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे कृत्य करणारा आरोपी हा मुंबईतील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका प्रकार काय आहे?

राजस्थानमधील पाली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पाली येथील सरधना परिसरातील जंगलात शेळ्या चारणाऱ्या वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. हत्या करुन हा आरोपी इथेच थांबला नाही तर मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस ओरबाडून सुद्धा खाल्ले. या कृत्याने आरोपी तरुणाचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र, ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारधना गावात राहणारी वृद्ध महिला शांती देवी या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी तरुणाने त्यांना जंगलात गाठले आणि दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे डोकेदगडाने फोडले.
दगडाने ठेचल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्ले. त्यानंतर आरोपीने स्वत:चा शर्ट काढला आणि मृत महिलेचा चेहरा झाकून ठेवला. जंगलात शेळ्या चारत असलेल्या काही लोकांनी हे पाहिल्यावर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थ तेथे येत असल्याचं पाहून आरोपीने तेथून पळ काढला. मग ग्रामस्थांनी एक किलोमीटर पाठलाग करुन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीने आपल्या दाताने महिलेच्या चेहऱ्यावरील मांस ओरबाडून खाल्ल्याचे त्याने कबूल केले. आरोपी तरुण हा मुंबईतील निवासी असून त्याचे नाव सुरेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 24 वर्षीय आरोपीला ड्रग्जचे व्यसन आहे. मुंबईतील हा तरुण राजस्थानमधील जंगलात काय करत होता आणि त्याने या वृद्ध महिलेची हत्या का केली? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ताज्या बातम्या

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Desi Jugaad    8

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Vivo X90 Pro Vivo  iPhone

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Sky Force Teaser

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Virushka second baby news

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच

Ghee Side Effects

Beed Crime: बीड शहरात गोळीबार, एक गंभीर जखमी!

Beed Crime

सणासुदीच्या काळात ग्राहकांची दीवाळी! SBI च्या 3 मोठ्या घोषणा! , जाणून घ्या काय आहेत OFFERS?

  SBI 3    OFFERS

Panchami Shraddha 2023: अविवाहित पितरांचे या तिथीला करा श्राद्ध, पितृदोषापासून मुक्ती मिळेल

Panchami Shraddha 2023
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited